Home बुलडाणा आमदार साहेब जरा आमच्या गावाकडे ही पहा हो ,??

आमदार साहेब जरा आमच्या गावाकडे ही पहा हो ,??

109

 

 

दोन दिवसा नंतर साखरखेर्डा येथील विधुत पुरवठा सुरू ,

अमीन शाह

साखरखेर्डा ,

नेहमी प्रमाणे साखरखेर्डा व परिसरातील विधुत पुरवठा दोन दिवसा पासून खंडित झाला होता मोठ्या प्रयत्ना नंतर तो आज रात्री सुरुळीत सुरू झालं साखरखेर्डावासी मूलभूत सुविधां पासून वंचित असून येथे जरासा पाऊस वारा आला की दिवसभर लाईन बंद होते नळ असून काहीच उपयोग नाही वीस वीस दिवस नळातून पाणीच येत नाही मुस्लिम बहुल वस्तीत कचरा गाडी येत नसल्यामुळे कचऱ्याने नाल्या तुळूम्ब भरल्या आहेत गावातील अंतर्गत रस्ते थोडा जरी पाऊस आला तर चिखलमय होत आहे , या सर्व मुलभूत सुविधां कडे आमदार डॉ , राजेंद्र शिंगणे साहेबांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असून सर्व सामान्य नागरिक आमदार साहेबांना भेटूच शकत नाही अशी परिस्थिती आहे आमदार साहेब गावात आले की कार्यकर्त्यांना भेटतात व निघून जातात साहेब तुम्ही असे का करता ? आम्ही ही तुम्हाला आमचा अमूल्य मत तुम्हाला दिलेला आहे असे येथील सामान्य नागरिक बोलत आहे ,

जनता दरबार ”

मागील पाच वर्षां पासून आज पर्यंत आमदार डॉ , राजेंद्र शिंगणे साहेबांनी एकदाही येथे जनता दरबार घेतलं नाही व जनतेच्या समस्या जाणून घेतल्या नाही साहेब गाडीत बसून येतात अन , जे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणतात तेच ऐकून निघून जातात येथील मतदारांच्या अनेक समस्या आहेत ते जाणून घेण्याचा साहेब कधी प्रयत्न ही करत नाही असे का ?

आमदार साहेबांना मतदार संघात आमचा गाव दिसत नाही का ?

सिंदखेडराजा मतदार संघात सर्वात मोठा गाव साखरखेर्डा आहे येथे विजेची समस्या ,पाण्याची समस्या , रस्त्याची समस्या पासुन आज साखरखेर्डा गाववासी वंचित आहेत साहेबांचा संपूर्ण लक्ष मतदार संघातील देऊळगाव राजा , सिंदखेडराजा या मोठ्या शहेरा कडे असतो आमदार साहेब जरा आमच्या गावा कडे ही बघा हो असा प्रश्न येथील गावकरी करीत आहे ,