Home बुलडाणा एस टी बसवर वीज कोसळली, महिला कंडक्टर जखमी तर 10 ते 15...

एस टी बसवर वीज कोसळली, महिला कंडक्टर जखमी तर 10 ते 15 प्रवासी सुखरूप..

200

 

मलकापूर :- अकोल्यावरून मलकापूरकडे येत असलेल्याएम एच.07.सी 9217 क्रमांकाच्या बसवर वीज कोसळून एक महिला कंडक्टर जखमी झाली. तर बस मध्ये असलेले दहा ते पंधरा प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. मलकापूर आगाराची बस आज सायंकाळच्या सुमारास अकोल्यावरून मलकापूर कडे येत असताना आयटीआय कॉलेज जवळ आली असता बस वर वीज कोसळली. या घटनेत बसच्या वरील पत्रा फाटला असून बसचा काच फुटल्याने महिला कंडक्टर च्या हाताला लागून महिला जखमी झाली आहे.