Home बुलडाणा आज चंद्रदर्शन आणि ‘तरावीह ‘ ची नमाज ! तर उद्या रमझान महीन्यातील...

आज चंद्रदर्शन आणि ‘तरावीह ‘ ची नमाज ! तर उद्या रमझान महीन्यातील पहिला रोजा !

154

सिंदखेड राजा

भगवान साळवे

मुस्लिम धर्मात पवित्र अश्या रमजान महिन्याचे चंद्रदर्शन सोमवर दि 11 ला सायंकाळी होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर तरावीह ची पवित्र अशी नमाज होणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे ठिकठिकाणी मस्जिद मध्ये साफसफाई करून पाण्याची व्यवस्था आणि रोशनाई करण्यात आली आहे मंगळवार ला पहिला रोजा राहणार आहे उर्दू कॅलेंडरनुसार शाबान महिना संपल्यानंतर नंतर रमजान महिन्याला सुरुवात होते त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांमधे रमजान चा मोठा उत्साह दिसून येत आहे त्यासाठी मुस्लिम बांधवांनी आतापासूनच रमजान साठी जोरदार तयारी सुरु केली आहे
मार्च आणि एप्रिल महिन्यात कडक उन्हाळ्यात रमजानचा हा महिना येत आहे त्यासाठी रोजा पकडताना रोजेदाराना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे , मुस्लीम बांधव दरवर्षी पवित्र रमजान महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात . सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन होईल असा अंदाज आहे . चंद्रदर्शन होताच रात्रीपासून ‘ तरावीह’च्या नमाजला सुरुवात होईल .यावेळी विविध मशिदींमध्ये पवित्र ‘ कुराण तरावीच्या नमाज पढण्यात येनार आहे रमजानचा रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. या महिन्यात मुस्लिम समाजाचे लोक रोजा ठेवतात. जास्तीत जास्त वेळ इबादत’मध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न भाविक करतात. ३० दिवस रोजे ठेवल्यानंतर ईद साजरी करण्यात

येते. यंदा ११ एप्रिलला ईद साजरी होईल, असा अंदाज आहे.
काही कारण नसताना मुस्लीम बांधवांनी रोजा अजिबात सोडू नये, रोजाचे महत्त्व मोठे आहे. आयुष्यभरही रोजे ठेवले तर एक दिवसाच्या रोजाची बरोबरी होत नाही, नमाज, रोजा, जकात, फित्रा यावर भाविकांनी भर द्यावा, श्रीमताला गरिबाचे दुःख कळावे, यासाठी रमजान आहे. श्रीमंतालाच जकात द्यावी लागते. वैज्ञानिकदृष्ट्या रोजाचे महत्त्व अनेक डॉक्टरांनीही मान्य केले. महिनाभर देशात शांतता नांदावी, यासाठी दुआ करावी.

———————————————
अरबी शब्दकोशात उपवासाला सौम म्हणतात, म्हणून या महिन्याला अरबीमध्ये माह-ए-सियाम असेही म्हणतात. फारसीमध्ये उपवासाला रोजा म्हणतात. उपवास सुरू करण्यापूर्वी, सकाळी काहीतरी खाल्ले जाते ज्याला सेहरी म्हणतात. यानंतर, सूर्यास्तानंतर संध्याकाळी ते उपवास सोडतात आणि खातात, ज्याला इफ्तारी म्हणतात. इस्लामिक विश्वासांनुसार, रमजान महिन्यात अल्लाहकडून पैगंबर मोहम्मद यांना कुराणातील आयते प्राप्त झाली. त्यामुळे हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो.

———————————————-

रमजानच्या महिन्यात गरजूंना शक्य तितकी मदत करावी,
रमजानच्या काळात, प्रत्येक उपवास करणार्‍या व्यक्तीसाठी पाच वेळची नमाज खूप महत्त्वाची असल्याचे आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात जकात म्हणजेच ईदपूर्वी दान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. एखाद्याने आपल्या वर्षाच्या कमाईतील अडीच टक्के रक्कम जकातमधील गरजूंना दान करावी लागते.
केवळ रोजादारच नाही तर या महिन्यात उपासना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अल्लाहचे आभार मानले पाहिजेत
सरताज शेख
मलकापूर पांग्रा