Home बुलडाणा माणुसकी सोशल फाउंडेशनचा राष्ट्रीय माणुसकी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ – सचिन खंडारे...

माणुसकी सोशल फाउंडेशनचा राष्ट्रीय माणुसकी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ – सचिन खंडारे यांना जाहीर ।

136

 

२६ फेब्रुवारीला नाशिक येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार प्रदान ।

 

अमीन शाह

बुलडाणा प्रतिनिधी

माणुसकी सोशल फाउंडेशन नाशिकचा राष्ट्रीय माणुसकी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४ सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील धडाडीचे युवा पत्रकार सचिन खंडारे यांना जाहीर झाला आहे
सचिन खंडारे हे महाविद्यालय जीवनापासून पत्रकारिता करत आहेत गेल्या १४ वर्षापासून विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी काम केले आहे ,शिवाय कथा, ललित लेख , कविता, असे विविध साहित्य सुद्धा त्यांचे अनेक वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झाली आहेत . त्यांनी दैनिक देशोन्नती, दिव्य मराठी .पुण्यनगरी, दै . महासागर , दै . भारत संग्राम , दै . सायरन . दै . सत्ता शासन , दै . बेधडक .इत्यादी दैनिकामध्ये काम केले आहे . शेतकरी कष्टकरी , ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्याचे व न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे , पत्रकारीतेच्या माध्यमातून त्यांनी गावातील पाणीसमस्या . शेतरस्ते, डांबरीकरणाचे रस्ते, अतिवृष्टीची नुसकान भरपाई इत्यादी समस्याचे निराकरण केले आहे . तसेच विविध सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ते अग्रेसर असतात वृक्षारोपन , गरिबांना मदत करणे, रक्तदान शिबीराचे आयोजन , विविध उपक्रम ते राबवित असतात .याच कार्याची दखल घेऊन माणुसकी सोशल फाउंडेशन नाशिक द्वारा आयोजित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित
पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना राष्ट्रीय माणुसकी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे . माणुसकी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे

तसेच राष्ट्रीय सचिव अविनाश झोटिंग
यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली आहे . येत्या २६ फ्रेबुवारीला नाशिक येथे होणाऱ्या ग्राहक उपयुक्त संरक्षण समितीच्या वर्धापन दिन कार्यक्रमांमध्ये
माजी न्यायधीश अशोक आव्हाड . जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्षा सौ . मंदाकिनी भोसले . कैलास पवार जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक मोहन आडागळे , मा . पुरवठा अधिकारी निफाडकर
सकाळची मा संपादक उत्तम कांबळे .आमदार एडवोकेट राहुल ढिकले .संदीप कर्णिक नाशिक पोलीस आयुक्त . मोनिका राऊत पोलीस उपायुक्त नाशिक .प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त नाशिक . एल . सोनवणे शिक्षण उपसंचालक नाशिक
यांच्यासह दिग्गज मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे
दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरित केले जाणार आहे .
सचिन खंडारे यांना राष्ट्रीय माणुसकी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .