
महिलेला गुंगीचे औषध देवून अत्याचार, शेगावातील राजकिय व्यक्तिवर गुन्हा दाखल
अमीन शाह
शेगाव (बुलडाणा ) पक्षात मोठे पद मिळवून देण्याचे आमिष दाखवत अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील 38 वर्षीय विवाहितेशी फेसबुकवर मैत्री करून विश्वास संपादन केले व घरी बोलावून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी शेगाव शहरात उघडकीस आली आहे. यापक्ररणी विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. शेगाव शहरातील राजकिय क्षेत्रात कार्यरत असलेला आशिष सत्यनाराय व्यास वय 37 रा. स्वामी विवेकानंद चौक याची फेसबुक या सोशल मिडीयावर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याधमील कुन्हा गावातील एका 38 वर्षीय विवाहित महिलेशी मैत्री झाली. यावेळी आशिष व्यास याने सदर महिलेला स्वता राजकिय पक्षात मोठ्या पदावर असल्याचे भासविले. तसेच महिलेला मोठ्या पदावर नियुक्ति मिळवून देण्याचे आमिष दाखवून मैत्री गठ्ठ केली. यावेळी महिलेला आई बिमार असल्याचे सांगून 1 फेब्रुवारी रोजी घरी बोलाविले. आणि स्वामी विवेकानंद चौकस्थित घरी नेवून शरबत पाजले. सदर शरबत मध्ये गुंगीचे औषध टाकून विवाहितेला बेशुध्द केले. आणि तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे नग्न छायाचित्र काढून तिला सोशलमिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी आरोपी एवढ्यावरच न थांबता सदर विवाहितेला वेळोवेळी शेगाव येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराला कंटाळून शेवटी महिलेने शेगाव शहर पोस्टेला 17 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आशिष सत्यनारायण व्यास याचेविरूध्द कलम 376 (2), (),328,504,506 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शेगाव शहर पोलिस करीत आहेत.












































