Home बुलडाणा साखरखेर्डा येथील पुलाचे निकृष्ट दर्जाचे अर्धवट काम करून ठेकेदार फरार ,

साखरखेर्डा येथील पुलाचे निकृष्ट दर्जाचे अर्धवट काम करून ठेकेदार फरार ,

212

 

जिल्हाधिकारी यांच्या कडे चौकशीची मागणी ,

अमीन शाह

बुलडाणा

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील भोगावती नदी व सवडद , मोहखेड येथील नदी वर गेल्या दोन वर्षा पूर्वी शासनाने पुलाचे काम मंजूर करून कोट्यावधी रुपयांचा निधी ठेकेदाराला दिला होता , हळू हळू सबंधीत ठेकेदाराने या तिन्ही पुलाचे काम अत्यन्त संथ गतीने निकृष्ठ दर्जाचे करून पूल बांधकाम पूर्ण न करताच अर्धवट अवस्थेत सोडून ठेकेदार आपल्या बांधकाम साहित्या सह फरार झाला आहे तिन्ही पुलाचे काम अर्धवट अवस्थेत झाल्या मुळे या पुलावर मोठं अपघात होण्याचा मोठं धोका निर्माण झाला आहे या तिन्ही पुलाच्या कामाची चौकशी करून निकृष्ठ दर्जाचा पुलाचा काम करनाऱ्या संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तिर्व आंदोलन छेडण्याचा इशारा एम आय एम च्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ , मोबिन खान मो , शफात जिल्हा सचिव साखरखेर्डा शहर अस्लम शाह , शेख आकील बुलडाणा , युनूस शाह तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा , असिफ कुरेशी यांच्या स्वाक्षरी आहेत ,