Home बुलडाणा देऊळगाव मही येथील उपोषण सुटले‌, प्रशासनाकडून उपोषण कर्त्याच्या सर्वच मागण्या पूर्ण.

देऊळगाव मही येथील उपोषण सुटले‌, प्रशासनाकडून उपोषण कर्त्याच्या सर्वच मागण्या पूर्ण.

168

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:- येथील शेतकरी रामदास पाटीलबा शिंगणे व शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस रामेश्वर वायाळ हे गेल्या २ आॕक्टोबर पासुन आपल्या अकरा मागण्यांसाठी देऊळगाव मही येथील महामार्गानजिक असलेल्या श्री राम मंदिराजवळ उपोषणाला बसले होते.उपोषणाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असल्याने सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी पुढाकार घेत ६ आॕक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता उपोषण कर्त्याची भेट घेत दखल घेत राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता कच्चाले यांच्या,वनविभागाचे पदाधिकारी तसेच महावितरण तसेच महसुल प्रशासनाने जवळपास उपोषण कर्त्याच्या सगळयाचं मागण्या पूर्ण करत प्रत्येक विभागाने लेखी पञ दिले.
यामध्ये महत्त्वाचे रखडलेला रस्ता सुस्थितीत करण्यासाठी महामार्गाचे अभियंता कच्चाले यांनी चिखली टाकरखेड रस्ता रखडलेल्या लांबीमधील उजव्या बाजूला असलेल्या रस्त्याचे २० फुट लांब सिंमेटचा रस्ता एका महिन्याच्या आत तयार करुन द्यावा.न्यायालयाच्या निकालानंतर मंजुरी प्रमाने करण्यात यावा.न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत प्रवाशांचा ञास कमी होईल.रस्ता तयार करत असताना डाव्या बाजूने वळण रस्ता करण्यासाठी संबंधित शेतकरी यांनी संमती दिली आहे.सदर रस्त्यावर न्यायालयीन न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काम करण्यास मनाई असल्याने असे असताना उजव्या बाजूकडील शेतकरी यांनी काम करण्यास संमती दिल्यानंतरच काम करण्यात येईल असे संबंधित विभागाने लेखी पञ दिले आहे.व इतर मागण्या पूर्ण केल्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण कर्त्याचे समाधान झाल्याने उपोषण कर्त्यानी उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या हस्ते ज्युस घेत उपोषण सोडले.यावेळी त्यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.समाधान गायकवाड,शेकाप चे अॅड. मा. दत्ता भाऊ भुतेकर, राष्ट्रीय महामार्ग अभियंता कच्चाले साहेब, तसेच विविध प्रभागातील प्रमुख माननीय अधिकारी साहेब,जवळपास चा ग्रामीण भागातील मा.सरपंच व ग्रामीण भागातील अनेक मंडळी, जिवन देशमुख, गजानन झाडोकर,संजय शिंगणे,प्रदीप हिवाळे,तेजराव मुंढे,राजूभाऊ खंडूजी शिंगणे, पिंटू शिंगणे,सीताराम शिंगणे, दिगांबर काका शिंगणे, समाधान तेजनकर, अशोक गुरव,रामदास तेजनकर, अरुण इंगळे, विष्णु गुरव, हरीश शिंगणे, आकाश शिंगणे, शुभम वायाळ व तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.