Home बुलडाणा समृध्दी महामार्गावर पुन्हा अग्नितांडव, टायर फुटल्याने ट्रक जळाला ,

समृध्दी महामार्गावर पुन्हा अग्नितांडव, टायर फुटल्याने ट्रक जळाला ,

122

उडाली खळबळ ,

गुलशेर शेख
दुसरबीड प्रतिनिधी दि.४ ऑगस्ट
समृध्दी महामार्गावरील नागपूर कॉरिडोर चैनल क्रमांक २९८.९ हुन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.१६ सिसि ८७३० चे मागचे टायर फुटल्यानंतर झालेल्या घर्षनाने ट्रकला आग लागली. या आगीने ट्रक व केमिकल भस्मसात झाल्याने मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हि घटना गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धानोरा-अंजनी गावाजवळ घडली.
याबाबत हकीकत अशी की समृद्धी महामार्गाच्या चैनल क्रमांक २९८.९ जवळ आल्यानंतर नगरहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.१६ सिसि ८७३० चे पाठीमागील टायर फुटले. दरम्यान मागील व्हिलचे रस्त्याला लागून घर्षनाने आगीत रूपांतर झाले. तर ट्रकमध्ये असलेल्या केमीकलने आणखीनच पेट घेतला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर यांच्यासह अग्निशामक दल व महामार्ग पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली. तसेच सदर वाहन चालक व क्लिनर हे वाहनातून निघून गेल्याबाबत स्थानिक नागरिकांनी कळवले त्यामुळे कोणीही जखमी नसल्याचे समजते.