
.जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार आदिवासी साम्राज्याच्या जव्हार (जयहर) संस्थान शकास ६८० वर्ष पूर्ण जव्हार संस्थानचे मूळपुरुष जयबा महाराजांनी जव्हार (जयहर) संस्थान साम्राजांचा पाया राजगुरू श्री सदानंद महाराजांच्या कृपेेेेनेे रचला. संस्थान स्थापन केल्या नंतर जयबा मुकणे महाराजांनी भोपतगड किल्ला जिंकून आपली पहिली राजधानी बनवली पुढेे १४ व्या शतकात या साम्राजाची धुरा श्रीमंत राजेे धुळबाराजे मुकणे सांभाळत होते. इ.स. १३४० मध्येे महंमद तूघलक याने जव्हारवर स्वारी करून धुळबा राजांना कैद केले. यामुळेे धुळबा राजांचेे भाऊ होळकरराव मुकणे यांनी तुघलकांचा नाशिकचा सुभेदार याच्यावर हल्ला केेला ,या हल्ल्याचा नाशिकच्या सुभेदारास प्रतिकार करता आला नाही. म्हणुन त्यानी तुघलकास कळवले की,धुळबा राजांस मुक्त केल्यास हा त्रास कमी होईल. तुघलकांने धुळबा राजांना मुक्त करून त्यांना नाशिक ते कल्याण ५००० चौ.कि.मी ९लाख उत्पान्नाचा प्रदेश व २२ किल्लेे देेऊन ‘शहा’ हा किताब ताम्रपटावर दिला व जव्हार येथे पाठवण्यात आले.
या दिवसाची आठवण म्हणुन धुळबाराजांनी आपले स्वतंत्र असे “जव्हार शक” सुरू केलेे. या शकाची सुरूवात दि. ६ जुन १३४३ पासून ते १० जुन १९४८ पर्यंत जव्हार संस्थानांत करण्यात येत .आज या जव्हार शकास ६८० वर्ष पुर्ण झाली.

योगायोग असा की आजच्या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजी यांचा राज्याभिषेक झाला. आणि याच ६जुन१६७४दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजी यांनी “शिवराज्याभिषेक” शक सुरू केले आज या शकास ३५० वर्ष पुर्ण झाली.
जव्हार (जयहर) संस्थान च्या परंपरे नुसार या गडावर राजध्वज नेताना सर्व मंडळींचा हिरारीने पूर्वीपासून सहभाग असतो,संस्थांनचे राजे कार्यक्रमानंतर खाऊ वाटत असत ती परंपरा आजही श्रध्देने जपली जात आहे…सध्याचा कार्यक्रम जव्हार संस्थानचे राजे महेंद्रसिंह मुकणे महाराज यांच्या परवानगीने व मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला, यावेळी मोखाडा पंचायत समिती उपसभापती श्री प्रदीप वाघ,झाप ग्रामपंचायत चे सरपंच श्री एकनाथ दरोडा, महादेव कोळी समाजाचे विश्वस्त श्री मगन पाटील, अध्यक्ष श्री विजय शिंदे, सरचिटणीस श्री प्रदीप वारघडे, कैलास नवले संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच याकरिता मोलाचे सहकार्य स्थानिक पातळीवर ग्रामस्थ,ग्रामपंचायत,वनविभाग ,पोलीस यंत्रणा ,पोलीस पाटील,सरपंच,गावचे पुजारी,वरिष्ठ या सर्वांच्या सहकार्याने पार पाडले जाते…
तसेच या वेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील मानवंदना देण्यात आली .
भुपतगडाचा इतिहास गौरव शाली आहे, आदिवासी समाजातील श्रीमंत मुकणे राजघराण्याचा तत्कालीन राजकारभार या किल्ल्या वरून केला गेला, त्यामुळे हा किल्ला खुप महत्वाचे स्थान आहे, तेव्हा या क्षेत्राला पर्यटन क्षेत्र विकास निधीतून विकास कामे केली पाहिजे तसेच महाराष्ट्र शासन पुरातत्त्व विभागाने विशेष लक्ष दिले पाहिजे यासाठी मा.मुख्यमंत्री महोदयां कडे तातडीने पाठपुरावा करणार.
श्री प्रदीप वाघ












































