Home यवतमाळ निसर्गस्नेहींनी घेतला वाघाडी संरक्षण व संवर्धनाचा संकल्प

निसर्गस्नेहींनी घेतला वाघाडी संरक्षण व संवर्धनाचा संकल्प

162

पर्यावरण दिनी श्रमदान करुन जगजागृती

यवतमाळ (प्रतिनिधी) यवतमाळचा एतिहासीक वारसा असलेल्या वाघाडी नदीचे संरक्षण व संवर्धन व्हावे आणि जलजागृतीतुन पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने पर्यावरणस्नेही यवतमाळकरांनी वाघाडी येथे ४१ व्या आठवड्यातील श्रमदान केले. निमीत्त होते जागतिक पर्यावरण दिनी स्वच्छ सुंदर वाघाडी अभियानांतर्गतच्या श्रमदान मोहीमेचे. यावेळी झालेल्या जनजागृतीपर मार्गदर्शनादरम्यान यवतमाळकर निसर्गस्नेहींनी वाघाडी च्या संरक्षण आणि संवर्धनाचा संकल्प केला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ श्रीकृष्ण पांचाळ यांचे अध्यक्षतेत पार पडलेल्या मार्गदर्शन सत्राप्रसंगी मंचावर यवतमाळ अर्बन बॅकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, उद्योजक राजु निवल, होमगार्डस अधिकारी निरंजन मलकापुरे, वन परिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र फाळके, प्रयासचे डाँ आलोक गुप्ता, एसएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा. रत्नदिप गंगाळे, सुरज मडगुलवार, एनसीसीचे आर कुमार, नेहरु युवा केंद्राचे अनिल ढेंगे उपस्थित होते.


वन विभाग, पोलीस विभाग, गृहरक्षक दल, कृषी विभाग, एनसीसी, एनएसएस, नेहरु युवा केंद्र, क्रिडाभारती, सायकलिंग क्लबसह यवतमाळात पर्यावरण विषयात सेवारत असलेल्या संस्था, संघटनांचे कार्यकर्ते वाघाडीला सकाळी ६ ते १० दरम्यान पर्यावरण विषयांतील विविध सेवाकार्यांत सक्रिय होते. यावेळी परिसर प्लास्टीकमुक्त करण्यात येऊन ओला आणि सुका कचरा वेचुन तो विभाजीत करण्यात आला. दोनही पुलांच्या काठावर टाकण्यात आलेल्या मुर्त्या पोलीस, गृहरक्षक आणि एससीसीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र गोळा केल्या. यावेळी झाडांभोवती आळे करण्यात येऊन त्यांना पाणीही देण्यात आले. पुलावरील जाळीचे व पिचिंगच्या कामांचा पाहणीही करण्यात येऊन इकोब्रिक्सपासुनच्या गोल आकाराच्या चबुतऱ्याचे कामांनाही सुरुवात झाली. अध्यक्षीय भाषणातुन डाँ. पांचाळ यांनी वाघाडीतील सेवाकार्यांचे कौतुक करुन येणाऱ्या पिढीला चांगली दिशा मिळण्यासाठी येथे प्रत्येक वयोगटातील सेवाकर्त्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले. श्री अजय मुंधडा यांनी प्रास्ताविकातुन वाघाडी येथे सुरु झालेल्या स्वच्छ सुंदर वाघाडी अभियानाची उकल करुन येथे झालेल्या पर्यावरणपुरक उपक्रमांची आणि कामांची माहिती दिली. संतोष भोयर यांनी सुत्रसंचालन केले तर अश्विन सवालाखे यांनी आभार मानले. आयोजनाकरिता भुषण ढोबळे, अविनाश बोबडे, प्रफुल्ल धोटे, सुमंत ठाकरे, आशिष कांबळे, शुभम पंचभाई, भुषण क्षीरसागर, अल्केश अंभोरे, आशिष हिंगलासपुरकर, रामचंद्र ढोबळे, अतुल टाके, अभीजीत खत्री, मिनाक्षी ढोबळे, अविनाश घाटे, समीर भांडेगावकर आदींसह डाँ विजय कावलकर, सुधाताई पटेल, मंगेश खुणे, वसंत उपगनलावार, शैलेश राव, उदय सज्जनवार या प्रयास यवतमाळ च्या चमुनेही स्वयंस्फुर्त श्रमदान केले.
—————–
चौकट
*वाघाडीच्या रक्षकांचा सत्कार*
वाघाडी येथे एक वर्षांपासुन नियमीत सेवा देणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ श्रीकृष्ण पांचाळ यांनी शाल, श्रीफळ, रोपाची कुंडी, पर्यावरण पुस्तक, डायरी, पेन आदी संच प्रदान करुन गृहरक्षक दलाचे निरंजन मलकापुरे, आम्ही साऱ्या सावीत्री या वसतीगृहाचे ईसु माळवे, देवस्थानाचे पुजारी उत्तमराव मानकर यांचा सत्कार केला.
—————-
चौकट
*वृक्षारोपण व खतनिर्मीती प्रकल्पाचा शुभारंभ*
वाघाडी परिसरात तीन निर्माल्य कुंड लावण्यात आले असुन त्यामध्ये ३ महिन्यात गोळा झालेल्या निर्माल्यावर प्रक्रिया करणाऱ्या खतनिर्मीती प्रकल्पाचे पुजन करुन त्याचा शुभारंभ देखील डाँ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी सर्व मान्यवरांनी कडुलिंबाचे वृक्षारोपण केले.
—————–
चौकट
*चिमुकलीने वेधले लक्ष…*
पुर्ण कार्यक्रमादरम्यान डाँ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधले. तिने वृक्षारोपणाला हातभार लाऊन झाडाला पाणी देऊ लागली. खतनिर्मीती शुभारंभातही तिने झारीने पाणी दिले तसेच सेवाकर्त्यांनाही श्रमदानादरम्यान साथ दिली. वडीलांनी देखील भाषणातुन आजच्या पिढीने हे सेवासंस्कार बघुन पुढे याचेच अनुकरण करतील असा आशावादही व्यक्त केला.