Home बुलडाणा .राधिकाची हत्या प्रकरणाच्या चौकशी साठी चिखली शहर कडकडीत बंद

.राधिकाची हत्या प्रकरणाच्या चौकशी साठी चिखली शहर कडकडीत बंद

198

 

*स्वयं स्फुर्तीने चिखली बंदला चिखलीकरांचा उस्फुर्त प्रतिसाद*

*स्व.राधिकाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाचा शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी*

अमीन शाह

चिखली – दि.१५ मे रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व राधिकाच्या हत्येचा तपास व हत्याऱ्यास फाशीच्या शिक्षेची मागणी यासाठी चिखलीवासीयांनी एकत्रित येत संपूर्ण शहरातून रॅली काढून चिखली बंद चे आव्हान केले असता चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
स्व. राधिका विलास इंगळे या चिमुकल्या मुलीची हत्या करणाऱ्या नराधमास त्वरित अटक करून फारची शिक्षा देण्याची सर्वपक्षीय नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी एकत्रित मागणी करण्यात आली आहे,
निवेदनात त्यांनी चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन संस्थान परिसरातील एका लग्न समारंभातून १२ मे रोजी दुपारी ११ वाजता हरवलेल्या राधिका इंगळे हिचा १३ मे रोजी दुपारी ३ वाजता तपोवन देवी परिसरात मृत देह आढळला असून प्रथम दर्शनी त्या बालीकेची निर्घुणपणे हत्या केल्याचे दिसत आहे, या अंत्यत दुदैवी घटणे बाबत चिखली परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन नागरीकांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे, चिखली वासीयांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे विनंती व्यक्त करण्यात आली की प्रशासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करुण दोषी नराधमास त्वरीत अटक करुण फाशिची शिक्षा दयावी अशी मागणी चिखली करांच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार गावंडे साहेब यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब,मा. पोलिस अधिक्षक साहेब ,मा. तहसीलदार साहेब चिखली यांना देण्यात आले कपिल खेडेकर यांनी चिखली बंदचे सर्व चिखलीकरांना भावनिक आव्हान केले होते या निवेदनावर कपिल खेडेकर,प्रशांत ढोरे पाटील,डॉ सतेंद्र भुसारी,बंडू बरबडे,विनायक सरनाईक,दत्ता सुसर,शिवाजी बाप्पू देशमुख,शैलेश गोंधने,श्रीराम झोरे,विलास घोलप,बंटी लोखंडे,जय बोन्द्रे,सचिन बोन्द्रे,कैलास गाडेकर,रविंद्र तोडकर,सागर पुरोहित,सचिन काकडे,आशिष महाडिक,मंगेश देशमुख गोलू काळे पाटील,राकेश चोपडा, प्रदीप भवर,कृष्णा जाधव,दिलीप वाघ,अनिल वाकोडे,राहुल देशमुख,काशिनाथ शेळके,अरुण अंबसकर, मनिष गवई,नारायण भुजबळ, शँकर शर्मा,दीपक गुळवे,शैलेश कापसे,सुनील रग्गड,अमर भाकरे,अविनाश वाणी,संदीप लोखंडे, सागर खरात, उमेश खरे,मुश्ताक शेख,दत्तात्रय देशमुख, शंभू गाडेकर,प्रवीण भुतेकर,शहजाद अलिखान,खलील बागवान, अत्तहर काझी,नासीर खान,सचिन बोंडे, गुरुराज बिडवे,कैलास देशमुख, दुर्गेश मोरे,सिद्धेश्वर चेडे, सुशील ठेंग,शैलेश देशमुख, राहूल देशमुख, ओम सपकाळ, रवी सपकाळ,सदानंद चेडे निवेदनावर आदींच्या सह्या आहेत,

 

पुन्हा मृतदेह सापडला ,

आज सकाळी चिखली तालुक्यातील आंबशी फाट्यावर एक मृतदेह सापडला असून खळबळ उडाली आहे मृतदेह मिळाल्याची बाब समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर मृतदेहा जवळ विषाची बाटली सापडली असून हा मृतदेह साखर खेरडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तांदुळवाळी येथील ज्ञानेश्वर बुंधे 45 यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे पुढील तपास चिखली पोलीस करीत आहे ,