

जालना – लक्ष्मण बिलोरे
१९९८ साली मैत्रेय ग्रुप कंपनीने गुंतवणुकदारांना लग्न,सुरक्षा आणि भविष्यासाठी तरदूत म्हणून आर्थिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते.त्यासाठी समाजातील बेरोजगार युवक ,महिलांना कमिशन बेसवर एजंट म्हणून नियुक्त केले.यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. हाहा म्हणता अल्पावधितच राज्यभरात आणि परराज्यात मैत्रेयचे जाळे पसरले.सुरूवातीला रितसर परतावे मिळत गेले.२०१६ साली मैत्रेय मॅनेजमेन्टने गुंतवणुकदारांचा विश्वासघात केला.१९९८ ते २०१६ या कालावधित देशातील १४ राज्यातील मैत्रेयच्या १२५ कार्यालयाच्या माध्यमातून २ कोटी १६ लक्ष गुंतवणुकदारांची सुमारे २५ कोटी रूपयांची फसवणूक केली.मैत्रेयच्या सिएमडि वर्षा सत्पाळकर गेल्या ६ वर्षांपासून फरार आहे. राज्यभरात विविध पोलिसठाण्यात गुंतवणूकदारांच्या वतीने गुन्हे दाखल आहेत.दरम्यान,प्रतिनीधी आणि गुंतवणुकदारांच्या संघटनाच्या माध्यमातून गेल्या सात वर्षात मोर्चे,आंदोलन करण्यात आली शासन,प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली.वर्षा सत्पाळकरला अटक करण्यात यावी,मैत्रेय प्रकरणाची सिबीआय चौकशी करण्यात यावी ,मैत्रेय गुंतवणुकदारांना त्याचा घामाचा,हक्काचा पैसा मिळालाच पाहिजे या स्वरूपाच्या मागण्या लोकाधिकार परिषदेच्या वतीने उचलुन धरण्यात आल्या आहेत. लोकाधिकार परिषदेच्या वतीने नागपूर येथे संविधान चौकात १५ मे पासून साखळी आमरण बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व लोकाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर गेडाम,परिषदेच्या महासचिव माया उके यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांनी केले आहे.