Home जालना लोकशाहीत जनतेच्या मनातील दहशत संपवणे आवश्यक – सतीश घाटगे

लोकशाहीत जनतेच्या मनातील दहशत संपवणे आवश्यक – सतीश घाटगे

75

घनसावंगी – लक्ष्मबिलोरे

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे.भारताने लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे.परंतु आपल्या भागात जनतेच्या मनात प्रचंड दहशत आहे, आणि या दहशतीमुळे जनता मनातील विचार किंवा भागातील चुकीच्या गोष्टींबद्दल खुलेआम बोलू सुद्धा शकत नाही.त्यामुळे जनतेच्या मनातील दहशत संपवणे आवश्यक आहे.अन् ती दहशत संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,असे प्रतिपादन भाजप नेते सतीश घाटगे यांनी केले आहे.

अंबड तालुक्यातील गोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळावा व भारतीय जनता पक्षाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी कृषि उत्पन्न बाज़ार समिती संचालक शिवाजी कटारे,शिवाजी मोरे,बालाजी खोजे,अनिरुद्ध झिंजूर्डे,प्रणित हर्षे,भगवान बर्वे,राहुल गुलजकर,राहुल कनके,अशोक कनके, ॲड राहुल कनके,पांडूरंग सुडके,संदीप फटांगडे,उमेश काळे,अप्पासाहेब शिंदे,बाबुराव वाळेकर,इकबाल शेख, नजीर शेख,महेश कांबळे,बाबा उढाण यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना घाटगे म्हणाले की,आपल्या भागात उसाचे राजकारण मोठ्या प्रमाणात होते.ऊस हे पीक शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे.यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते.यानंतर कोणालाही उसाचे राजकारण करू देणार नाही.तसेच काही राजकारणी हे आमच्या तरुण कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देत आहे.त्यांना त्रास देणे बंद करावे.भाजपा पक्ष हा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करू नये.

तसेच तळागाळातील लोकांची छोटी – मोठी जी काही कामे असतील ती तुम्ही घेवून या.त्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.आपल्याकडे लोकशाही शासन पद्धती आहे.त्यामुळे जनतेने जे चुकीचे आहे.त्याचा विरोध करुन नेत्याला त्यांची जागा दाखवावी.कोणालाही घाबरायची गरज नाही.तुम्हाला काही त्रास झाल्यास संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी मोहन पवार,अविनाश थोरे,अमोल येटाळे,सुनिल पल्हारे,शिवाजी काळे,योगेश पवार,पवन पवार,धनंजय तिळवने,जयराम मकासरे,सुरेश तिळवने,जालिंदर बर्गे,ईश्वर गांधले,विनोद तिळवने,सतिश तिळवने,आकाश थोरे,भय्यासाहेब दुष्यंत,योगेश आडागळे,काळू आडागळे,महादेव कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.