Home बुलडाणा निसर्गाची किमया ऐन उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर ,

निसर्गाची किमया ऐन उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर ,

62
अमीन शाह
बुलडाणा जिल्ह्यासह, चिखली,  मोताळा, नांदुरा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने उरल्या-सुरल्या शेतातील पिकांची फार मोठी नुकसान झाली आहे. बुलडाणा व चिखली तालुक्यात मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना भरउन्हाळ्यात पूर आला आहे. मोताळा तालुक्यात या अवकाळी पावसाने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून राहते घराचे टिन पत्रे उडाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील धाड जवळील बाणगंगा नदीला पूर आला. तर डौलखेड येथे वीज पडून एक बैल ठार झाल्याची घटना घडली. 
      धाडसह परिसरात चिखली व बुलडाणा तालुक्यात अवकाळी पावसाने उन्हाळ्याचे दिवस असूनही सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारांचा वर्षाव २८ व २९ एप्रिल २०२३ रोजी जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे औरंगाबाद व धामणगावकडे जाणारे रस्ते जलमय झाले होते. पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांची अक्षरश: नुकसान झाली. वादळी वार्‍यामुळे या भागातील विद्युत तारा तुटल्यामुळे भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. जवळपास तीन तासांपेक्षा अधिक काळ मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आला. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात काही तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. नांदुरा तालुक्यातील मौजे डोलखेड येथील अनिल विजयसिग जाधव यांच्या मालकीचा बैल वीज पडून मृत्युमुखी झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गासह छोटे मोठे व्यापारी, सामान्य नागरिक तसेच लग्न सराईचे दिवस असल्याने वऱ्हाडी मंडळी त्रस्त होत असल्याचे दिसून येत आहे.