Home बुलडाणा देऊळगावराजा हायस्कूलच्या स्वच्छता समन्वयक, मॉनिटर्सचा सत्कार

देऊळगावराजा हायस्कूलच्या स्वच्छता समन्वयक, मॉनिटर्सचा सत्कार

91

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही :-महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या लेट्स चेंज या स्वच्छता चळवळीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देऊळगावराजा हायस्कूलचे स्वच्छता समन्वयक व मॉनिटर्ससह अधिकाऱ्यांचा शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या स्वच्छता चळवळीचे राज्य प्रकल्प समन्वयक रोहित आर्या यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. २ ऑक्टोबर ते दि. २४ डिसेंबर या कालावधीत स्वच्छता चळवळ राबवण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३० शाळांचे स्वच्छता समन्वयक
शिक्षणाधिकारी, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक व स्वच्छता मॉनिटर्स यांचा सोमवारी, दि. २४ एप्रिल रोजी मुंबई येथे सत्कार करण्यात आला. शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल इम्तियाज काझी, रोहित आर्या यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी

देऊळगावराजा हायस्कूलचे स्वच्छता समन्वयक जनाबापू मेहेत्रे, जिल्हा स्व मंगेश भोरसे, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, प्रथमेश तांबेकर, वैभव कास्तोडे, उत्कर्ष लहाने, अमित देशमुख व पालक प्रतिनिधी गजानन लहाने, वैशाली लहाने यांचा सत्कार करण्यात आला.