
थोर स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

जव्हार प्रतिनिधी-मनोज कामडी.
स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी सामाजिक प्रतिष्ठान खरवंद यांच्या वतीने स्वा. सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त त्याच्या मुळगावी खरवंद येथे गावातील महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सुरवातीला गावातून पालखी काढून संबळ वाद्य वाजवून त्याच्या घरापासून कार्यक्रम स्थळ पर्यत काढण्यात आली .त्यानंतर मान्यवरांचे आगमन झाल्यावर त्याचे ग्रामस्थांनी औक्षण केले.त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जव्हार आयुशी सिंह, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा सदस्या सुरेखा थेतले, पोलीस उपनिरीक्षक खादे ,तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे जिल्हा परिषद शाळा खरवंद च्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत गाऊन स्वागत केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी सामाजिक प्रतिष्ठान खरवंदचे अध्यक्ष विष्णू चौधरी यांनी आतापर्यंत प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या कार्याची माहिती प्रास्ताविक मध्ये करून दिली तसेच संस्थेने राबवलेले विविध उपक्रम व स्वातंत्र सैनिक रेवजी भाई यांनी जव्हार मोखाडा भागासाठी दिलेले योगदान त्याचे कार्य याविषयी त्यांच्या कार्याच्या उजाळा दिला त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आयुषी सिंह (भा. प्र.से) यांनी उपस्थित मान्यवर व महिलांना हिमोग्लोबिन तपासणी करण्यामागची भूमिका व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थचा आहारात समावेश असावा याविषयी मार्गदर्शन करताना प्रामुख्याने जव्हार- मोखाडा भागातील नाचणी या पिकाचे महत्त्व व त्यामधील नागली मधील प्रोटीनचे प्रमाण याविषयी मार्गदर्शन केले,जास्तीत जास्त महिलांनी आहारात नाचणीचा उपयोग केला पाहिजे,त्याच बरोबर नाचणी पासून विविध पदार्थ तयार करून त्याचा आहारात उपयोग केल्यास हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मददत होऊ शकते, तसेच आरोग्य विषयक महिलांच्या विविध समस्यांविषयी संबंधित आरोग्य विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत असलेल्या शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून महिलांचे बळकटीकरणं व महिलांचे होणारे स्थलांतर थांबवून महिलांचे आरोग्य सदृढ कसे होईल याविषयीही मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. किरण पाटील यांनी उपस्थित महिलांना शास्त्रशुद्ध पद्धतीने महिलांचे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय उपाययोजना करावी याविषयी मार्गदर्शन करताना आहारातील पालेभाज्या, बीट,गूळ, शेंगदाणे, मनुके, व इतर पौष्टिक आहार घेतला पाहिजे तसेच मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी जड कामे न करता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन काम केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर सुरेखा थेतले यांनी महिलांचे सक्षमीकरण व आजची आदिवासी भागातील महिला व तिचे आरोग्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन करताना महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन करणे कार्यक्रमाची आपल्या भागात अत्यंत गरज असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमधील आरोग्याची असलेली भीती दूर करण्यासाठी नक्कीच फायदा होईल तसेच आजची महिला ही पुरुषाच्या बरोबरीने पुढे येत असून महिलांचे आरोग्य कसे सुधारेल व महिलांनी घरी आपला आहार सुधारून त्यामध्ये जास्तीत जास्त तृणधान्याचा उपयोग व पालेभाज्यांचे उपयोग करावा तरच आपले हिमोग्लोबिन वाढेल याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित जव्हार पोलीस स्टेशन चे पोलीस उप -निरीक्षक खादे ,पोलिस हवालदार यशोदा कडाळी,पोलीस अंमलदार राठोड यांनी जनसंवाद अभियानाविषयी मार्गदर्शन करताना बालविवाह सारख्या अनिष्ठ प्रथा बंद करून मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नये असा यावेळी संदेश दिला. सदर कार्यक्रमाप्रसंगी ‘ आयडॉल आदिवासींचे’ या पुस्तकाचे लेखक नारायण शेंडे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कवी रवी बुधर यांनी स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या कार्याविषयी स्वलिखित कविता सादरीकरण करून कार्याच्या उजाळा दिला. सदर कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जामसरच्या डॉक्टर, सि.एच.ओ, ए .एन .एम सर्व टीमने उपस्थित राहून ५५ महिलांची हिमोग्लोबिन ची मोफत तपासणी पूर्ण केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेद अभियान अंतर्गत सिंधुताई महिला ग्रामसंघ खरवंद यांनी विशेष सहकार्य केले. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ डोके , आदिवासी समाजसेविका मीराताई महाले, म्हसे बाबा, माजी पंचायत समिती सदस्या अनुराधा डोके, खडखड ग्रामपंचायत सदस्य अनंता धनगरे, पोलीस पाटील जामसर संतोष मोंढे, ग्रामसेवक सुनिल भोये ,प्रकाश बंधु चौधरी, मगन भोये ,एस,एस, लोखंडे, गोपाळ भुसारे निवृत्त सह्यायक पोलीस निरीक्षक, निवृत्त नायब तहसीलदार कमळाकर कुवरे, गोविंद अवतार, कल्पेश खुरकुटे,स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विष्णू चौधरी, उपाध्यक्ष गोपाळ बोरसे, सचिव नारायण शेंडे,सदस्य नंदकुमार ठाकरे,रवी बुधर ,गोविंद गावित,सदाशिव राऊत व इतर प्रतिष्ठित मान्यवर व पदाधिकारी,ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कामडी यांनी केले.











































