

वर्धा – सेलू: तालुक्यातील तुळजापूर वघाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पञकार गजानन जिकार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. २३ एप्रिल रोजी येथील शिव हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात या प्रसंगी प्रथम पञकार गजानन जिकार यांचे ग्रामगीता साहित्य व वृक्षरोपटे देऊन सपत्नीक स्वागत करण्यात आले. या वेळी विनोद दोंदल यांनी सीड बॉल कसे तयार करायचे व वड या वृक्षाची वृक्षावरच कलम कशी तयार करावी या विषयी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून सविस्तर माहिती दिली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन केले तर आपल्या उर्वरित आयुष्यात एक प्रत्येकी वीस पंचवीस झाडे तयार होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास बरीच मदत होईल असे प्रतिपादन समितीचे विनोद सातपुते यांनी केले.
कार्यक्रमात या वेळी उपरोक्त समितीच्या विभागीय अध्यक्ष सुरेखाताई रडके, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विनोद दोंदल. वर्धा जिल्हाध्यक्ष विनोद सातपुते, सेलू तालुकाध्यक्ष विजया रोकडे, देवळी तालुकाध्यक्ष भरत कुकडे, हिंगणघाट तालुकाध्यक्ष पंकज दोडके, तालुका संघटक राहूल कहुरके, उपाध्यक्ष रवी येनोरकर, पुरुषोत्तम रोकडे, गजानन भोयर, शरद झाडे, अश्विनी झाडे, उपाध्यक्षा वंदना भोयर, इंदिराबाई रोकडे, ताईबाई झाडे, सचिव जितेंद्र आत्राम, वंदना जिकार.स्नेहल जिकार,प्रगती जिकार, माजी सरपंच कौसल्या लढी प्रणिता झाडे.समिर जिकार तसेच इतर मान्यवर व समस्त जिकार परिवार उपस्थित होते. यावेळी समितीतील प्रत्येक सदस्याने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहारा झाला.