Home पालघर राज्य दैनिक बाळकडू चे अधिकृत पत्रकार सुनिल जाबर यांची पालघर उपजिल्हाप्रमुख पदी...

राज्य दैनिक बाळकडू चे अधिकृत पत्रकार सुनिल जाबर यांची पालघर उपजिल्हाप्रमुख पदी निवड

71

जव्हार :-सोमनाथ टोकरे

राज्य दैनिक बाळकडू वार्ताहर मध्ये गेल्या काही वर्षांपासून फक्त विधानसभा मध्ये काम करत असून बाळकडू संपादक खरात गुरुजी साहेब यांनी सुनिल जाबर यांच्या कामाची दखल घेवून पालघर उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली .
सुनिल जाबर हा नेहमी जनतेचे प्रश्न घेवून सामाजिक कार्य व तसेच पत्रकार मध्ये अग्रेसर असतो आणि पालघर जिल्हातील अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा जव्हार तालुक्यातील वावर मध्ये सागपाणी या पाड्यात राहत आहे आणि त्याच्यावर आता बाळकडू वार्ताहर मध्ये पालघर जिल्ह्याची जबाबदारी दिली असून ती त्याने मनापासून स्वीकार केली आहे .
एकजुटीने रहा,जाती वादी वाद , गाडून मराठी माणसांची एकजूट उभारा,तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल ,उगाच आपण रडत रडत सर्वच गोष्टी करणार असाल तर काहीही अर्थ राहणार नाही,आपल्या हक्कासाठी लढा त्रास करू नका आणि अन्याय विरुद्ध पेटून उठा अन्याय सहन करू नका सहनही करू नका आणि गरज पडली तेंव्हाच दाखवून द्या .”हिंदुत्वाचा मानबिंदू , आवाज महाराष्ट्रचा” हे ब्रीदवाक्य हातात घेवून बाळासाहेबांच्या विचारांनी बाळकडू वार्ताहर ला सुरुवात करण्यात आली आणि आज प्रत्येक महाराष्ट्र मध्ये तळागाळात बाळकडू वार्ताहर पोहचला आहे आणि आज या मध्ये सगळ्या महाराष्ट्रात भर १२००( एक हजार दोनशे ) पत्रकार काम करत आहेत.