Home बुलडाणा आधार कार्ड वाढीव दिसत राव….

आधार कार्ड वाढीव दिसत राव….

167

मोफत प्रवासामुळे एसटी महामंडळाच्या बसेस हाऊसफुल
तिजोरीत मात्र पैशाचा ठणठणाट

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:- महाराष्ट्र शासनाने ७५ वर्षाच्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास योजना सुरू केल्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवाशी बसेस हाऊसफुल पाहायला मिळत आहे. मात्र तिजोरीत पैशाचा ठणठणाट राहत असल्याने वाहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. योजनेचा लाभ जास्तीत जास्त धनधाटके घेत असून मात्र गरजू गोरगरीबांना महागड्या एसटी प्रवाशी बसमध्ये प्रवास करावा लागत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे धनधाटके झाले वयोवृध्द अन् वयोवृध्द झाले तरुण अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. सरकार मार्फत सुरू केलेल्या मोफत प्रवास योजने अंतर्गत ज्यांचे वय हे ६५. असेल अशांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकाजवळ आधार कार्ड. मतदान कार्ड किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्ती अधिकारी यांना देण्यात आलेले ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट आणि पॅन कार्ड किंवा तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र तसेच एसटी बसचे स्मार्ट कार्ड किंवा डिजिटल पद्धतीमध्ये एम आधार किंवा डीजे लॉकर यापैकी कोणतेही ओळखपत्र असल्यास ही सवलत घेता येते. परंतू या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक धनधाटक्यांनी आपली अक्कल लढवून दुय्यम बोगस ओळखपत्र बनविले आहे.
वयोवृध्द योजनेचा लाभ घेण्याच्या लोकांकडे पाहिले असता सदर व्यक्ती धनधाटका पाहायला मिळतो. ओळखपत्र असल्याने धनधाटके राजरोसपणे प्रवाशी एसटी बसमध्ये प्रवास करीत आहेत आणि ज्यांना या योजनेची गरज लागते अशा गोरगरीब गरजू वयोवृध्द लोकांकडे कार्ड नसते त्यामुळे त्यांना महागडा प्रवास करावा लागत आहे. ही मोफत योजना सुरू होताच अनेक गावातील जेष्ठ महिला पुरुष एकत्र येवून देव दर्शन, तालुका, जिल्हा, अथवा बिनाकारण घराबाहेर पडतात. दररोज महामंडळ विभागाच्या प्रवाशी एसटी बसेस जेष्ठ नागरिकामुळे हाऊसफुल होवून हेलपाटे मारतात. मात्र ज्यांना अत्यंत गरज असते अशांना बसमध्ये जागाच मिळत नसून गर्दीत उभे राहून प्रवास करावा लागतो. एसटी बसमध्ये वाहक तिकीट काढण्यासाठी इकडून तिकडून चकरा मारतो परंतु बसमध्ये ज्येष्ठांची संख्या जास्त असल्यानेबाहकाच्या तिजोरीत पैशाचा ठणठणाट राहत असल्याने प्रवाशांना चिल्लर पैसे देतांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा प्रकार बुलडाणा ते जालना राजा प्रवाशी बसमध्ये पाहायला मिळाला. एव्हडे मात्र खरे…