Home बुलडाणा भारताची सीमा पार करण्याआधीच २गुन्हेगारांना ठेवल्या बेड्या “L.C.B.ची मोठी कामगिरी”

भारताची सीमा पार करण्याआधीच २गुन्हेगारांना ठेवल्या बेड्या “L.C.B.ची मोठी कामगिरी”

163

बांगलादेशात चालले होते पळून

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही:-येथील बस स्थानक चौकातील कमलेश मोबाईल शॉपी १४ डिसेंबरला रात्री आरोपींनी फोडून ३५८००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.देऊळगाव महीपोलीस ठाण्यात याप्रकरणी १५ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गीते त्यांच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहितीच्या आधारे छडा लावला.आरोपी बांगलादेशात जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पकडून जेलबंद केले.गुन्हेगार लुकमान खान मोहम्मद हा देऊळगाव मही येथे जेसीबी मशीलवर मजूर म्हणून काम करत होता.त्याने गाव सोडून जाण्यापूर्वी संजय कोठारी यांच्या मोबाईल शॉपी वर नजर ठेवून होता.सरम्यान संधी साधून साथीदार मोमीन खान होशियार खानसह मोबाईल शॉपी फोडून दोघेही फरार झाले होते.परंतु या दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालासह विविध कंपनीचे ११० मोबाईल पेन ड्राईव्ह ब्ँटरी चार्जर असे एकूण ५०१००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

*कामगिरीचे शिलेदार*
जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवड,अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी,अशोक थोरात, स्थागुशा प्रमुख बळीराम गीते,सायबरचे पोलिस निरीक्षण शांतिकुमार पाटिल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित वानखेडे,विलास कुमार सानप, मनीष गावंडे, श्रीकांत जिंदमवर सुधाकर काळे,सुनील खरात,गजानन गोरले,गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव,अनंता फरदळे,केदार फाळके,वैभव मगर, दुर्गेश राजपूत, राजू आढावे,कैलास ठोंबरे यांनी ही कामगिरी केली.

*( देऊळगाव मही येथील कमलेश मोबाईल शॉपी फोडून फरार झालेल्या २ गुन्हेगारांना भारताची सीमा पार करण्याआधीच पश्चिम बंगालमधील हुबळी येथून स्थानिक गुन्हे शाखेने २० डिसेंबर रोजी गजाआड केले आहे त्यांच्याकडून ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लुकमान खान मोहम्मद (२६) मोमीन खान होशियार खान (२७) रा. जनमत तालुका पुन्हना हरियाणा अशी अटक केलेला आरोपींची नावे आहे)*