Home उत्तर महाराष्ट्र हातगड किल्ल्याची हेळसांड थांबवा. समाधी,धारातीर्थे,किल्ल्याच्या वास्तूंची दुरवस्था.

हातगड किल्ल्याची हेळसांड थांबवा. समाधी,धारातीर्थे,किल्ल्याच्या वास्तूंची दुरवस्था.

279

 

शिवकालीन किल्लेदार गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांचे १३ वे वंशज मनोहर मोरे देशमुख

नाशिक:- किल्ले हातगडच्या माथ्यावरील ऐतिहासिक स्थानांची,पायथ्याच्या पाऊलखुणा असलेल्या मंदिर,समाधी,वास्तुंची,वाड्याच्या अवशेषांची मात्र हेळसांड झाली आहे.राज्यशासन,जिल्हाधिकारी वन,पुरातत्व,ला वारंवार पत्रे लिहिली,प्रत्यक्ष दिली,मात्र इतिहासाच्या मूळ अस्तित्वाला वाचवण्यासाठी कोणी पुढं येत नसल्याने खुप दुःख व वेदना होतात.आमच्या पूर्वजांच्या बलिदानाची ही कोणाला कदर नाही,आमच्या घराण्याचे स्थानिक पातळीवर काही अस्तित्व अधिकार राहिले नसल्याने दुःख होते अशी उद्विग्न्य प्रतिक्रिया शिवकालीन किल्लेदार गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांचे १३ वे वंशज मनोहर मोरे देशमुख यांनी किल्ले हतगाड येथे (दि १३ नोव्हेंबर २०२२) रोजी दिली.
यावेळी मनोहर मोरे देशमुख यांचे सोबत सरदार घराण्याचे जेष्ठ पत्रकार विकास काका देशपांडे,पाळे (ता.कळवण)
येथील रामेश्वर देवस्थान चे निष्काम सेवक हभप प्रभाकर महाराज पाळेकर यांनी किल्ले हातगडच्या परिसराची पाहणी केली.
“शिवकाळात किल्लेदार म्हणून नेमलेल्या आमचे पूर्वज वीर गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांना छत्रपती शिवरायांनी दिलेली जमीन,वाडा,४२ गावांची जहागिरी व सोबत दिलेले २८ शिवकालीन ताम्रपट,जुनी पत्रे ही याव्यतिरिक्त आमच्याकडे उदरनिर्वाहासाठी एक इंच जागा जमीन नाही.ही त्यागाची शिदोरी का?”असा सवाल ही श्री मोरे देशमुख यांनी यावेळी केला.
पूर्वजांच्या त्यागाची ही भूमी जपण्यासाठी धडपड असते मात्र विरोध,प्रसंगी मारहाण याव्यतिरिक्त आम्हाला काहीही मिळाले नाही असेही शेवटी ते म्हणाले.
यावेळी हभप.प्रभाकर बाबा यांनी ही “इतिहास ही शक्ती असून साधूसंतांची सेवा ही भक्ती आहे.किल्ले हे भक्ती व शक्तीचे अधिष्ठान आहे,आपला शिवबा ही भक्तीचा सागर होता”असे त्यांनी याप्रसंगी सांगितले,तर जेष्ठ पत्रकार विकास देशपांडे यांनी यावेळी बोलतांना सांगितले की”हातगड हा गुजरात-महाराष्ट्र सीमेवर आहे,या किल्ल्यामूळ येथे पर्यटन रोजगार आहे,अनेकांची पोट भरतात,मात्र किल्ल्याच्या संवर्धनात राबतो कोण?उलट डोळ्यासमोर इतिहास नष्ट होत असताना आता जागते व्हा,असा विचार त्यांनी यावेळी मांडला.दरम्यान किल्ला पाहणी नंतर सुरगाणा येथील तहसीलदार सचिन मुळीक यांना निवेदन पत्र देण्यात आले.

फोटो ओळी::-
किल्ले हातगडच्या पाहणीसाठी शिवकालीन किल्लेदार गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख यांचे १३ वे वंशज मनोहर मोरे देशमुख,हभप प्रभाकर बाबा पाळेकर,जेष्ठ पत्रकार विकास देशपांडे इत्यादी..