
यवतमाळ – आज दिनांक 17 – 11 – 2022 गुरुवार रोजी बारा वाजता यवतमाळ जिल्हा आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते यांनी लोहारा येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.

बाबुळगाव तालुक्यातील फाळेगाव कोली आणि बागेवाडी या भागामधील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील डीपी जळल्यामुळे आणि अनेकदा त्याबाबतची बाबुळगाव अभियंता यांच्याकडे तक्रार दिल्या परंतु त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही व त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता रब्बीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना विजेची फार आवश्यकता आहे , कारण की शेतामध्ये विज नसल्यामुळे ते कोणत्याही प्रकारचे काम करू शकत नाही व त्याकरता म्हणून आज मुख्य अभियंता यांच्याकडे जड़लेल्या डीपी दुरुस्त करून देण्याबाबत मुख्य अभियंता मडावी साहेब यांच्याकडे चर्चा करण्यात आली व त्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी दुरुस्त करून त्यांना मदत करावी ही विनंती करण्यात आली, त्याबाबत मुख्य अभियंता मडावी साहेब यांनी पाच-सहा दिवसांमध्ये आम्ही या तक्रारीचे निवारण करू असे आश्वासन दिले. यावेळी यवतमाळ शहर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय वसंतराव जी ढोके , शहराध्यक्ष श्री गुणवंतराव इंदूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री विलासजीवाडे, यवतमाळ जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष आकाश चमेडिया, यवतमाळ तालुकाध्यक्ष शेख मोबीन ,बाबुळगाव तालुका अध्यक्ष बंडू महानोर, यवतमाळ विधानसभा युवा अध्यक्ष शुभम जी चांदेकर , शहर युवा उपाध्यक्ष अक्षय बनावडे , शहर संघटन गोपाल गावंडे, नागेश्वर जी भुते होते व प्रकाश डब्बावर अशोकरावजी काळमोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.











































