Home बुलडाणा पोलिसांनी मेहकर येथे पकडला 40 लाखांचा गुटखा ,

पोलिसांनी मेहकर येथे पकडला 40 लाखांचा गुटखा ,

345

 

तीन आरोपींना अटक ,

अप्पर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या पथकाची धडाकेबाज कार्यवाही

अमीन शाह ,

बुलढाणा

आज दि 20/08/2022 रोजी पो उप निरीक्षक पंकज सपकाळे यांना गोपिनय माहिती मिळाली की जळगाव खान्देश येथून लोणार येथे आयशर गाड़ी मधे राज निवास गुटखा अवैध विक्री साठी वाहतूक होणार आहे अश्या खबरे प्रमाणे मा अपोअसा खामगांव पदभार अपोअसा बुलढाना यांचे आदेशाने लोणार फटा मेहकर येथे नाका बंदी करुण आयशर गाड़ी क्र MH 04 EB 9872 मधे 25,63,200/- रू चा राजनिवास सुगंधि पान मसाला गुटखा
व वाहन असा एकूण 40,95,200/-रू मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी अजय लीलाधर गोसावी, साग़र यशवंत औतार दोन्ही रा. जळगाव खान्देश,गजानन मापारी रा. लोणार याचे विरुद्ध पो स्टे मेहकर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदर कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सा बुलढाना यांचे मार्गदर्शनाखाली मा अपर पोलीस अधीक्षक सा खामगांव पदभार अपोअसा बुलढाना यांचे अदेशाने पोउपनी पंकज सपकाळे, पो हे का गजानन बोरसे, ना पो का गजानन आहेर,ना पो का संदिप टकसाळ ,पो का राम धामोड़े यांनी केली