Home पश्चिम महाराष्ट्र पत्रकार प्रताप मेटकरी यांना ‘उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान….!!

पत्रकार प्रताप मेटकरी यांना ‘उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान….!!

40
0

सतीश डोंगरे

सांगली , दि. २९ :- जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने दिल्या जाणार्‍या “उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार – 2020” ने दैनिक जनप्रवासचे खानापूर तालुका प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तिंचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने दिला जाणारा “उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार – 2020” दैनिक जनप्रवासचे खानापूर तालुका प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांना जाहीर झाला होता. सांगली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते “उत्कृष्ट ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार – 2020″ने प्रताप मेटकरी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते स्वप्नील जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाचे राज्यसंघटक संजय भोकरे, पत्रकारसंघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, पत्रकारसंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष शेखर जोशी, जिल्हा संघटक प्रकाश कांबळे, वृत्तवाहिनी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष रविंद्र कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting