Home जळगाव राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा...

राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला मुक्ताईनगर शहरात प्रतिसाद मिळाला

56
0

शरीफ शेख – रावेर

जळगाव , दि. २९ :- केंद्र सरकारने सीएए आणि एनआरसी हा कायदा घटनेविरूध्द लागू केला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजच सोबत 85% समाज तर हिंदु समाजातील मोठा घटक व बहुजन समाज बाधीत होणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने शांततेत बंद पाळण्याचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चा वतीने करण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.मुक्ताईनगर शहरातील छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभाग घेतला. शाळा, रुग्णालये, औषध दुकाने, बँका इ. अत्यावश्यक सेवा वगळता मुक्ताईनगर शहर कडकडीत बंदमुळे इतर व्यवहार ठप्प झाले आहे. मुक्ताईनगर शहर कळकळीत बंदमूळे शांतता ठेण्यात आल्याने कोणताही अनसुचित प्रकार घडला नसल्याचे चित्र आहे.बहुजन क्रांती मोर्चा वतीने आज बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला मुक्ताईनगर येथील व्यापारी व शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मुक्ताईनगर शहरातील छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी सकाळपासूनच आपापली दुकाने बंद ठेवली होती. या बंद मध्ये बहुजन क्रांती मोर्चा चे संयोजक प्रमोद सौंदडे,जळगाव मणीयार बिरादरी चे उपअध्यक्ष हकीम चौधरी,शिव सेना अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान,शकील मेंबर,माजी सरपंच जाफर अली,आसिफ शेख,असगर शेख,बहुजन मुक्ती मोर्चा चे ब्रीजलाल इंगळे,भारत मुक्ती मोर्चा चे राजू वानखेडे,बेरोजगार मोर्चा चे सुपडा हीरोले,युवा मोर्चा चे सिध्दार्थ इंगळे,बहुजन क्रांती मोर्चा चे अरुण जाधव,बाम सेफ कार्यकर्ता मनोज पौहेकर,राष्ट्रीय किसान मोर्चा चे कैलास पाटील,
छत्रपती क्रांती सेने चे राहुल हरणे,बहुजन मुक्ती मोर्चा चे संजू इंगळे,बी एफ चे विशाल जवान,
,रफिक सलाम,कलिम मणीयर,मुशीर मनियार,मोहन मेंडे,शकूर जमादार,नवाब किंग फाऊंडेशन चे अरबाज खान, लब्यक फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे जूबेर अली व मिलत ग्रूप चे शोएब पठाण, सर्व पदाधिकारी उपस्थित होते व यांच्यासह सर्व मुस्लिम समाजाचे लोकांनी या बंद मध्ये सहभाग घेतला.दरम्यान, मुक्ताईनगर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन लक्ष ठेवून होता.तसेच बहुजन क्रांती मोर्चा तर्फे भारत बंद मध्ये सहकार्य करणारे व्यापारी बांधवना गुलाब पुच्छप देउन आभार मानले या वेळी बहुजन क्रांती मोर्चा चे तसेच मणीयर बिरादरी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting