Home बुलडाणा माझा गाव माझा सन्मान ही सरपंच पतीची संकल्पना इतरही गावांनी राबविण्याची गरज...

माझा गाव माझा सन्मान ही सरपंच पतीची संकल्पना इतरही गावांनी राबविण्याची गरज – पालकमंत्री डॉ.शिंगणे

532

पाडळी शिंदे येथे विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

 

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही:-पाडळी शिंदे स्थानिक ग्रामपंचायत ने केलेल्या विविध प्रकारच्या विकास कामाचे लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळा पार पडला व नवीनच संकल्पना राबविण्यात आली सदर संकल्पना सरपंच विद्या शिंदे यांचे पती प्राध्यापक श्रीकृष्ण नारायण शिंदे यांनी माझा गाव माझा सन्मान सोहळा ही संकल्पना पाडळी शिंदे चे नाव लौकिक वाढविण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेऊन गावाचे नाव मोठे केले त्यांचा आहे गौरव करण्यात आला सदर कार्यक्रम पालकमंत्री माननीय नामदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते २९एप्रिल रोजी संपन्न झाला तसेच ग्रामपंचायत ने केलेल्या विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले तसेच विविध विकास कामाचे भूमिपूजन सुद्धा करण्यात आले तसेच शेती विकासासाठी शेतरस्ते महत्त्वाचे असून पाडळी शिंदे शिवणी आरमाळ हा शेतरस्ता कपिला नदीतील पुला सह तसेच महादेव मंदिर परिसरात भव्यदिव्य त्यासाठी पंचवीस लाख रुपये सभामंडप तसेच पाडळी वाकद हा सुद्दा राहिलेला शेतरस्ता पूर्ण करण्यासाठी तसेच युवकांसाठी व्यायाम शाळा आदी मागण्या सरपंच पती श्रीकृष्ण शिंदे यांनी प्रस्ताविक मध्ये। केल्या नंतर केल्या तात्काळ सदर मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आश्वासन दिले तसेच घरकुल संबंधित अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच पाडळी शिंदे गावाचा आदर्श सिंदखेडराजा मतदार। संघातील सगळ्याच गावात राबविने आवश्यक आहे तसेच युवा होतकरू सचिन गणपत शिंदे या युवकाने काबाडकष्ट करणारे शेतकरी यांच्या सोयीसाठी आरोग्य उपकेंद्र गावाला आवश्यक असून ते गावाला देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली ते उपकेंद्र सुद्दा देण्याचे आश्वासन पालकमंत्री महोदय तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सत्काराला उत्तर देतांना दिले,तसेच गावाचे नाव विविध क्षेत्रात सर्वप्रथम झळकावून नाव लौकिक वाढविणाऱ्याचा तसेच प्रतिनिधित्व करण्याऱ्याचा सन्मान अभिनव उपक्रम राबविण्यात आला त्यात “माझा गाव -माझा सन्मान “या उपक्रमा द्वारे विविध क्षेत्रातील व्यक्ती ज्यांनी गावाचे नाव त्या त्या क्षेत्रात कार्यरत असतांना उंचावण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा सन्मान पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या हस्ते ट्राफि देऊन गौरविण्यात आले .सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन पवार राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये मेहकर चे माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे,विनायक पडघाण,नितीन शिंगणे,समाधान शिंगणे, राजू चित्ते, नाझरे काझी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे राहणार असून उदघाटन म्हणून पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे होते, सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्या शिंदे सरपंच ग्रामपंचायत व गावकरी मंडळी यांनी केले होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ शिंदे सर, प्रस्तावित श्रीकृष्ण शिंदे, तर आभार शिवानंद शिंदे यांनी केले.