
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया ,
अमीन शाह
बुलडाणा ,
ध्वनी प्रदूषणचा केंद्राच्या कायदा आहे व कायद्यात सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन आहे. या कायद्यानुसार जिल्ह्यात कोणताही भोंगा उतरविणार नाही आणि कायद्यात तशी तरतूद पण नाही. त्यांना नियमित कस करायचं त्याची प्रक्रिया आमची सुरू आहे. ते आम्ही करू असे वक्तव्य बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक अरविद चावरिया यांनी बुलडाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.
राज्यातील मशिदीमधील 3 मे पर्यंत भोंगे उतरवा अन्यथा मशिदी समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अरविंद चावरीया म्हणाले की, ध्वनी प्रदूषणचा केंद्राचा कायदा आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन आहे. तो महाराष्ट्रातच लागू आहे. अशातला भाग नाही तो संपूर्ण भारतात लागू आहे. मात्र त्याचा बाऊ आपल्या राज्यातच केला जातोय, पण त्याचेही काही नियम अटी शर्ती आहे. त्यापमाणे आम्ही आमची कारवाई करू त्यात काही विषय नाही. परंतु भोंगे उतरू, उतरविणार असे काही होणार नाही. आणि कायद्यात तशी तरतूद पण नाही. त्यांना नियमित कस करायचं त्याची प्रक्रिया आमची सुरू आहे. ते आम्ही करू. आणि ते फक्त मशिदीला लागू होणार नाही ते सर्व धार्मिक स्थळाला लागू आहे. शिवाय कुठल्याही वाहनाचे हॉर्न वाजवल ते सगळ्या प्रकारचा ध्वनी प्रदूषणला लागू आहे. तो विशिष्ट जाती-धर्माला किंवा मंदिर-मशिदीला लागू आहे अशातला भाग नाही. तर त्याबाबद्दल आम्ही खबरदारी घेवू.
येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पल्हाद काटकर यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड, प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्यासह मौलवी हाफीज रहेमत, हारून मास्टर साहब, दिलीप जाधव, ऍड. बल्लाड, नगरसेवक अफसर, अरविंद होंडे, सत्तार कुरेशी, माजी नगरसेवक युनूस कुरेशी, जाकीर कुरेशी, हाजी बिलाल, एड मो. जावेद, यांच्यासह असंख प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.












































