Home बुलडाणा त्याने तिला मँसेज केला अन , विपरितच घडलं ?

त्याने तिला मँसेज केला अन , विपरितच घडलं ?

790

 

मुलाची गळफास घेऊन आत्महत्या ,

अमीन शाह

बुलडाणा ,

19 एप्रिल रोजी बुलढाणा शहराला लागून असलेल्या सागवन भागात एक धक्कादायक घटना घडली . माझ्या बहिणीला मोबाईल वर मेसेज केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी युवकाच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केली या मुळे आपला व आपल्या आई वडिलांचा अपमान झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . माझ्या बहिणीला मॅसेज का केला असे म्हणत मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाच्या घरात घुसून धिंगाणा राडा घातला . तरुणाची गाडी फोडली , मोबाईल दगडाने ठेचला , घरातील महिलांची , मुलींची छेड काढली व मारुन टाकण्याची धमकी दिली अन् निघून गेले . या नंतर तरुणाने थोड्याच वेळात घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे
काल रात्री दहा वाजता बुलडाणा शहराला लागून असलेल्या सागवन भागात ही घटना घडली . स्वामी समर्थ नगर , सागवन , बुलडाणा येथील आदित्य बळीराम येवले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे . आदित्यच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार काल , 19 एप्रिलच्या रात्री साडेआठच्या सुमारास रोहित उर्फ रबल्या जाधव , विशाल जाधव , अनुज सुरडकर , राहुल सुरडकर असे आदित्यच्या घरात घुसले . त्यावेळी राहुल सुरडकरच्या हातात तलवार होती . तु माझ्या बहिणीला मॅसेज का केले असे विशाल जाधव आदित्यला म्हणाला , तेव्हा आदित्यने आधी तुमच्या बहिणीने मॅसेज केले असे सांगत मोबाईल दाखवू लागला . तेवढ्यात रोहिणीने आदित्यच्या हातातील मोबाईल हिसकला आणि ती मॅसेज पाहू लागली . तिच्या हातातून तिचा भाऊ रबल्याने मोबाईल हिसकला आणि घराच्या बाहेर नेऊन मोबाईल दगडाने ठेचला व तोडून टाकला . आदित्यची मोटारसायकल त्यांनी दगडाने फोडून टाकली . आदित्यच्या घरात तोडफोड केली आणि आदित्यला स्टीलच्या रॉडने मारहाण केली . आदित्यला वाचवायला गेलेल्या घरातील महिलांची छेडखानी केल्याचा आरोप सुद्धा आदित्यच्या आईने तक्रारीत केला आहे . तू मर नाही तर आम्ही तुला मारून टाकु अशी धमकी देऊन मुलीचे नातेवाईक निघून गेले . हा अपमान आदित्य याला सहन न झाल्याने आदित्यने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आदित्यच्या आईने दिलेल्या तक्रारीत केला आहे

या प्रकरणी आज 20 एप्रिल रोजी दुपारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत अधिक तपास बुलढाणा पोलीस करीत आहेत ,