Home पश्चिम महाराष्ट्र दिपक गणपतराव शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या ” प्रदेश...

दिपक गणपतराव शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या ” प्रदेश अध्यक्ष ” पदी एकमताने निवड

59
0

 

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलची स्थापना करण्यात आली, यावेळी दिपक गणपतराव शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी सैनिक सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली सदर नियुक्ती पत्र शरद पवार साहेबांच्या हस्ते देण्यात आली.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब, खासदार सुप्रिया ताई सुळे , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब, आदरणीय कर्नल संभाजी पाटील साहेब, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस मा. श्री. शिवाजीराव गर्जे साहेब, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप साहेब, प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. प्रमोद हिंदुराव, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश संघटक सचिव मंगेश मोरे, OBC सेल चे श्री. अर्जुन गरुड, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी सैनिक यांच्यासह प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत पद नियुक्ती सोहळा संपन्न झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल स्थापन झाल्याने पक्षातील कार्यकर्त्यात जोश निर्माण झाला असून निवडीबद्दल अभिनंदन होत आहे. यावेळी सुभेदार पांडुरंग शिरसाट, सरपंच कॅप्टन SM काळवाघे, बुलढाणा, सुभेदार अजित निंबाळकर, कोल्हापूर, कॅप्टन बाबू गोविंद पोळके, सोलापूर, सुभेदार, सुधीर शिंदे, सातारा, हवालदार पोपट पडवळ, शिरूर, नायब सुबे. संदीप देसाई, सातारा, हवालदार देविदास मुंडे, बीड, हवलदार अजीत काटे, बारामती, पुणे, शिपाई विशाल जाधव, दौंड, हवालदार अनिल फुंदे, सुभेदार किसन भोबाड, माजी सैनिक विजय सिरसाट, माजी सैनिक, कृष्णकांत शिरसाट, माजी सैनिक, विष्णुपंत हांगे, माजी सैनिक शिवाजी काळे, माजी सैनिक शंकर शिरसाट माजी सैनिक अभिजित बेळगे, माजी सैनिक महादेव शिरसाट, माज़ी, सैनिक मूढ़े तातेराव देवीदास, नगर, माज़ी सैनिक चंद्रकांत देवड़े, नगर, सुभेदार प्रवीण येवले, सातारा, सुभेदार सुरेश उमाप, शिरूर, पुणे, हवलदार राजेन्द्र धुमाल, शिरूर,पुणे, हवलदार शहाजी धुमाल,शिरूर,पुणे हवलदार विलास शिवले, शिरूर, पुणे माज़ी सैनिक जयदीप घोलप, हवेली,पुणे आदी अनेक माजी सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
Next articleसामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय ‘अभिमान पुरस्कार’ जाहीर
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.