Home मराठवाडा राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

288

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

वर्धा,औरंगाबाद व गेवराई येथे वकिलांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत.त्यामुळे वकिलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे ह्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच वकील संरक्षक कायदा तात्काळ मंजूर करण्यात यावा.याकरिता राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाच्या वतीने अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,वर्धा येथे न्यायाधीश यांच्यासमोर एका वकील भगिनीवर चाकूने हल्ला करण्यात आला.औरंगाबाद येथे देखील वकीलावर हल्ला करून त्यांचा हात तोडण्यात आला आहे.तसेच गेवराई येथे सुध्दा वकीलावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.यातून दिवसेंदिवस वकिलांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे,असे दिसून येत आहे.त्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.

या सर्व हल्ल्यांचा निषेध करण्यात येत आहे.वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात कठोर शिक्षा नाही.त्यामुळे वकिलांच्या संरक्षणासाठी कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी.तसेच वकील संरक्षण कायदा तात्काळ मंजूर करण्यात यावा,अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाच्या वतीने अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनावर राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष ऍड ज्ञानेश्वर एकनाथ गावडे,जिल्हाउपाध्यक्ष ऍड एल.ए.गायके,जिल्हा संघटक ऍड आर.टी. कुलकर्णी,अंबड तालुकाध्यक्ष ऍड व्ही.पी.दावणगावकर,उपतालुकाध्यक्ष ऍड ज्ञानेश्वर शेंडगे,जिल्हा सरचिटणीस ऍड एस.व्ही.सातपुते,जिल्हा सल्लागार ऍड एम.बी.पाठक,ऍड.जी.पी.मुंजाळ,ऍड.ए.के.जाधव,ऍड.बी.सी.देशमुख,ऍड.आर.आर.कुलकर्णी, ऍड एस.आर.भावले,ऍड एस.एम.पाटील,ऍड विलास सुबुकडे,ऍड कृष्णा साबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.