Home यवतमाळ सामाजिक कार्यकर्ते पवन शर्मा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम…!

सामाजिक कार्यकर्ते पवन शर्मा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम…!

223
0

 

यवतमाळ – शहरातील रामनगर येथील रहिवासी पवन शर्मा हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहे १४ एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तो विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून.सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या नंतर ढुमणापुर देवस्थान येथे श्री हनुमानजी व श्री बालाजी यांचे दर्शन घेऊन अभिषेक करण्यात आले.

त्यानंतर विशुद्ध गो सेवा सदन येथे गाईसाठी हिरवा चारा उपलब्ध करून देण्यात आला तसेच गुळ तुला हा कार्यक्रम पार पडला. मातोश्री वृद्धाश्रम येथे वृध्दांना मेडिकल किट व धान्यांच्या किट वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. पवन शर्मा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक युवकांनी रक्तदान करून पवन शर्मा यांचा वाढदिवस साजरा केला. त्याच प्रमाणे राममंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तर मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भेट वस्तू देण्यात आल्या. त्याच प्रमाणे उन्हाळ्याचे दिवस असल्याने जनावरांना पाणी मिळावे यासाठी ठिकाणी पाण्याची टाकी व पक्षासाठी पाणीपोई ची सुविधा करण्यात आली. तर सायंकाळी पवन शर्मा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने योगिन तिवारी व सुरज महल्ले यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध झाली असून पवन शर्मा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रम राबवत पवन शर्मा याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आनंद भाऊ ठोकडे, सुरज जैन योगिन तिवारी,सुरज महल्ले, अल्पेश चिकटे ,पराग सावरकर ,रुपेश मारबते,सुरज उके,फारूक अन्सारी राम नथवाणी,राम टेंबरे,निखिल अतकरी निखिल कोवे,रुपेश बरमकार,वसीम खान निशांत डोईजड,शुभम सपकाळ,सागर मिश्रा,शुभम बड़ाए,अमित धनरे, गौरव इंगले,मनीष हिवरकर उपस्थित होते तर विशालभैया दुबे, जुगलभाऊ तिवारी यांच्या हस्ते व विजू भाऊ कोटेचा बंडूभाऊ पट्टे व सर्व मित्र परिवाराच्या प्रमुख उपस्थिति उपस्थित रुग्णवाहिकेचा लोकार्पण करण्यात आला.

Previous articleअहंकार घडविणारा आहे बिघडविणारा सुद्धा आहे – ह. भ. प. युगंधरा वीरकर
Next articleराष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.