Home बुलडाणा चिखली देऊळगाव राजा रोडवरील हायमास्टर लाईट फक्त नावाला उजड नाही गावाला

चिखली देऊळगाव राजा रोडवरील हायमास्टर लाईट फक्त नावाला उजड नाही गावाला

625

येत्या ५ मार्च पर्यंत हायमास्टर लाईट सुरू करण्यात यावे अन्यथा ते लाईट खांब काढून घेण्यात यावे

अन्यथा ग्रामपंचायत चा विद्युत पुरवठा खंडित करून, ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल.. गणेश शिंगणे-स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रतिनिधी:-[रवि अण्णा जाधव]
देऊळगाव राजा:-दोन वर्ष पुर्वीपासुन चिखली देऊळगांव राजा रोड वरील रस्ताचे काम देऊळगांव मही पर्यंत पुर्ण झालेले असुन, त्यामध्ये रात्रीच्या रहदारीसाठी हायमास्टर लाईट बसविण्यात आले. रात्री लोंक अंधारात फिरत असतात. त्यामुळे आपल्या देऊळगांव मही मध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील हायमस्ट लाईट अज्ञात वाहनाच्या धक्याने वाकला आहे. तसेच मंगलदिप कापड केंद्रासमोरील हायमस्ट लाईट सुरु होण्यापुर्वीच खांबावरील लाईट चालु बंद करण्याचा बाँक्स ग्रामपंचायतच्या दुर्लक्ष कारभारामुळे चोरीस गेला आहे. तसेच छत्रपती चौकातील लाईटसाठी वेगवेगळ्या पक्षांनी व गावातील समाज सेवकांनी वारंवार निवेदन देऊनही गेले 2 वर्षापासुन आपण सर्व निवेदनांना केराची टोपली दाखविली आहे. व देऊळगांव मही शहरातील हायमस्ट लाईट शोभेची वस्तु बनली असुन, आपल्या घोळघाळीच्या कारभारामुळे आपल्या देऊळगांव मही चे शुभोभिकरणास ब्रेक लागला आहे. ही सर्व हायमस्ट लाईट येत्या 5 मार्च 2022 पर्यंत सुरु करण्यात यावे .अन्यथा हे सर्व लाईट खांबामुळे अतिक्रमण झाले असुन , ते लाईट खांब काढुन घेण्यात यावे.
अन्यथा ग्रामपंचायत चा विद्युत पुरवठा खंडीत करुण, ग्रामपंचायतला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा स्वाभिमानिचे तालुका अध्यक्ष गणेश शिंगणे यांनी दिला आहे.