
प्रतिनिधी:-रवि अण्णा जाधव
देऊळगाव मही:-गेल्या पंधरा दिवसापासून देऊळगाव मही येथे गतिरोधक अभावी दररोज अपघात घडत आहे या अपघातात अनेक जणांना आपले प्राण मुकावे लागले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे त्यामुळे देऊळगाव मही येथे गतिरोधक बसविण्यात यावे या साठी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून जीवनसाथी फाउंडेशन च्या वतीने 28 मार्च रोजी निवेदन देण्यात आले
गेल्या काही दिवसांपूर्वी
खामगाव जालना रस्त्यावर प्रवास करणाऱ्या व आजूबाजूच्या असणाऱ्या गावकऱ्यांनी भयावह चित्र रस्ता चे काम सुरू असताना अनुभवलेले आहे ,त्यात सध्या खामगाव-जालना चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून देऊळगाव मही येथे रस्ताचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे या ठिकाणाहून भरधाव वेगाने वाहतूक होत असल्याने दररोज अपघात घडत आहे, भविष्यात मोठी घटना होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.
सिदखेडराजा मार्गे जाणारे जड वाहने राहेरी पूल नादुरुस्त असल्यामुळे देऊळगाव मही मार्गाने वाहतूक वळती केली आहे त्यामुळे सर्व वाहतूक या रस्त्यावर सुरू झाली आहे वाहतूक वळती करण्यापूर्वी प्रशासनाने त्या ठिकाणी गतिरोधक बसविणे अपेक्षित होते मात्र तसे न करता वाहतूक सुरु केली आहे मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू झाल्याने मोठी विपरीत घटना या रस्त्यावर घडू शकते त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन देऊळगाव मही बस थांबा,डीग्रस चौक,शिवाजी विद्यालय , ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी गतिरोधक आवश्यक असून प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करु नये तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावे अन्यथा 7 मार्च 2021रोजी देऊळगाव मही येथे दुपारी 12 वाजता रास्ता रोखो करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला निवेदनावर जनार्दन टेकाळे,डॉ महेश दंदाले,संजय शिंगणे,संतोष जाधव,सुनील मतकर,शिवाजी शिंगणे,भगवान इंगळे,संजय कोठारी,अशोक शिंगणे , संतोष शिंगणे,अमोल बोबडे,रवींद्र कुलकर्णी,शेख उस्मान,रवींद्र इंगळे, आदिल पठाण व अन्य मंडळी उपस्थित होते











































