Home बुलडाणा अंढेरा फाटा जवळील घटना एस टी व मोटारसायकल चा अपघात ,”मोटारसायकल चालक...

अंढेरा फाटा जवळील घटना एस टी व मोटारसायकल चा अपघात ,”मोटारसायकल चालक जागीच ठार एक गंभीर जखमी”

374

 

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:-स्थानिक अंढेरा फाटा जवळील चिखली-देऊळगव राजा महामार्गावरील हाॅटेल विजय रेस्टॉरंट समोर आज सकाळी साडे दहावाजेच्या दरम्यान मोटारसायकल व एशियाड बस मध्ये झालेल्या विचीञ अपघातात मोटारसायकल चालक उत्तम साहेबराव गायकवाड रा.केळवद हे जागीच ठार झाले.


याबाबत पोलिस सुञाकडुन मिळालेल्या माहितीनुसार केळवद येथील मोटारसायकल चालक उत्तम साहेब राव गायकवाड हे व राजु केसकर रा.चिखली हे दोघे जालना येथे पाहुण्यांच्या घराची वास्तुशांती साठी मोटारसायकलने चालले होते.अंढेरा फाट्याला लागुन असलेल्या हाॅटेल विजय रेस्टॉरंट वरुन चहा नाश्ता साठी थांबले होते.ते आटोपुन मोटारसायकल क्रमांक एम.एच‌२८एपी७१९२ने जालना साठी निघाले असता महामार्गावरील मधोमध असलेल्या जागी दुसरी मोटारसायकल असल्याने व अंदाज चुकल्याने देऊळगाव राजा वरुन चिखलीकडे जाणार्या एशियाड बस क्रमांक एम.एच.२०.३७८२ ने मोटारसायकल ला समोरुन उडावल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक उत्तम साहेब राव गायकवाड जागीच ठार झाले.तर मागे बसलेले राजु केसकर हे गंभीर जख्मी झाले.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार गणेश हिवरकर,एएसआय तथा बिट जमदार गजानन वाघ,पोहेकाॅ सोनकांबळे,गवई, पोलीस शिपाई झिने,वाघमारे,पुसे,गिरी यांनी घटनास्थळ गाठुन जख्मी नां चिखली येथे रुग्णालयात दाखल केले.गंभीर जख्मी राजु केसकर यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले.मृतक उत्तम साहेब राव गायकवाड यांचे चिखली येथे शिवविछेदन करण्यात आले.