
सिंदखेडराजा
साखरखेर्डा येथे गुजरी चौकात असलेल्या सना क्लिनिक वर येथील माजी उपसरपंच उर्दू हायस्कुल चे लिपिक त्याचा भाऊ पुतण्या यांने हल्ला करून चाकू चा धाक दाखवून धमकी दिली 1 लाख 20 हजार रुपये नेल्याची घटना 30 जनवरी रोजी घडली होती या प्रकरणी आज डॉक्टर च्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारा मूळे गावात एकच खळबळ उडाली आहे ,
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या घटनेतील फर्यादी डॉ , जावेद आलम शेख यांनी दिलेल्या तक्रारी नुसार मी सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात आयुष्य मेडिकल आफिसर म्हणून कार्यरत आहे तर माझी पत्नी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षिका आहे , मला एक प्लॉट घ्यायचा होता त्या मुळे मी घरात एक लाख 20 हजार रुपये बँकेतून आणून ठेवले होते दरम्यान सकाळी आम्ही घरात असतांना मला बाहेरून आवाज आला मी रुग्ण आलेले असल्या च्या पाहून दरवाजा उघडला असता येथील आरोपी माजी उपसरपंच मो , अस्लम अंजुम , माजी ग्राम पंचायत सदस्य मो , अनवर व त्यांचा मुलगा मो , शबरेज उर्फ शादाब हे आले यातील मो , अस्लम याने मला म्हटले की तुमची एक आडिओ क्लिप माझ्या कडे आहे व मला तीन लाखा रुपये ध्या अशी धमकी दिली व खंडणी मागितली मी देण्यास नकार दिला असता यातील मो , अनवर याने जवळ असलेला चाकू काढला व माझ्या गळ्यावर लावला आरोपी मो , अस्लम याने ड्रेसिंग करण्याची कैची माझ्या गळ्याला लावून पैसे न दिल्यास गळा चिरण्याची धमकी दिली दरम्यान मी माझ्या पत्नीस पैसे आन असे सांगितले माझ्या पत्नी ने 1 लाख 20 हजार रुपये आणले त्या नंतर वरील तिघांनी मला मारहाण केली व माझ्या रुग्णालयाची तोडफोड केली नासधुस केली व एक लाख वीस हजार रुपये घेऊन गेले केले अश्या तक्रारी वरून साखरखेर्डा पोलिसांनी तिघं विरोधात कलम भा ,द , वी 384 , 34 अनवये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार रामदास वैराळ या घटनेचा तपास करीत आहे ,












































