
उपाध्यक्ष पदी रंजित खिल्ल्लारे;सचिव पदी प्रशांत पंडित तर कोशाअध्यपदी रवि आण्णा जाधव यांची नियुक्ती

प्रतिनिधी:-[ रवि आण्णा जाधव ]
देऊळगाव राजा:- मातृतिर्थ देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी प्रकाश साकला प्रकाश साकला,ऊपाध्यक्ष पदी रंजित खिल्लारे,सचिव पदी प्रशांत पंडित ,कोशाअध्यपदी रवि आण्णा जाधव, प्रसिद्दी प्रमुख पदी शब्बीर खान यांची नियुक्ती मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रविन्द्र काळे साहेब नवनियुक्त जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा बर्दे पत्रकार पुरूषोत्तम बोर्ड ,दिपकजी मोरे,बाबासाहेब जाधव, डिघोळे सर ,धांडे सर या प्रमुख मान्यवराच्या उपस्थीतित सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी राजेन्द्रजी काळे साहेब यांनी मावळते अध्यक्ष अशरभाई पटेल यांचा सत्कार केला व मातृतिर्थ तालुका पत्रकार संघाचे तोंडभरून कौतूक केले यावेळी मातृतिर्थ तालुका पत्रकार संघाचे पंडित,सम्मती जैन,पंढरी गिते, अशरफ पटेल,सुषमाताई राऊत,हे उपस्थीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमाताई राऊत यांनी केले तर सुत्रसंचलन रंजित खिल्लारे यांनी केले आभार प्रदर्शन सम्मती जैन यांनी मानले











































