Home उत्तर महाराष्ट्र मंत्र्यांच्या बंगल्याला गडकोटांची नावे राज्यातील दुर्गांची दशा बदलनार कधी?

मंत्र्यांच्या बंगल्याला गडकोटांची नावे राज्यातील दुर्गांची दशा बदलनार कधी?

257

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने राज्यसरकारला पाठवले निवेदन.

किल्ल्यावरील पडझडीत असलेले भग्नावस्थेत ऐतिहाशिक वाडे जोते

नाशिक – सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील बहुतांशी गडकोट अखेरची घटका मोजीत आहे.केवळ नावालाच उरलेल्या गडकोटांच्या ऐतिहाशिक पाऊलखुणा वाचवण्यासाठी केंद्र असो की राज्यसरकारचे कायमच दुर्लक्ष राहिले असतांना केवळ मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकोटांची नावे देऊन महाराष्ट्राच्या ऐतिहाशिक गडकिल्ल्यांची दशा बदलणार कधी?असा सवाल नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने राज्य सरकारला पाठवलेल्या निवेदनातून केला आहे.
“संपूर्ण राज्याचे सार हे गडकोट,
गडकोट हीच राज्याची
भाग्यलक्ष्मी, गडकोट हेच सैनिकांचे कुळ व मूळ,
गडकोट हेच राज्याचे प्राण
संरक्षण, गडकोट नसेल तर राज्य निराश्रित. छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात गडकोटांच महत्व,गडकोटांचे स्वराज्यात स्थान याबद्दल सविस्तर मांडणी आहे.मात्र हेच आज्ञापत्र व त्याचे विचार उरी बाळगून महाराष्ट्रात बोटावर मोजता येतील इतक्याच अभ्यासू दुर्गसंवर्धन संस्था गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अहोरात्र राबत आहेत,मात्र राज्यसरकार, केंद्रसरकार व त्यांचे केंद्र,राज्य पुरातत्व विभाग असो की बहुतांशी किल्ले ताब्यात ठेवणारे वनविभाग यांचेकडून मात्र महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक ठेवा मात्र सातत्याने दुर्लक्षित ठेवला गेला असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या गेल्या आहेत.मात्र अजूनही राज्यातील एकूण जलदुर्ग,भुईकोट,डोंगरी दुर्गांच्या संवर्धनाचा मूळ विचार व प्रत्यक्ष संवर्धनासाठी कृती आजपर्यंत कुठल्याही सरकारांनी केली नाही.परिणामी कुठल्याही अर्थसंकल्पात दुर्गसंवर्धनासाठी स्वतंत्र्य तरतूद ही करण्यात आली नाही.अहोरात्र राबणाऱ्या दुर्गसंवर्धन संस्थांना एक दमडी ही साहाय्य या सरकारांनी त्यांच्या विभागांनी केले नाही,परिणामी अश्या प्रमुख संस्थांची नोंद ही सरकारकडे नाही अशी एकूण दयनीय स्थिती आहे.यासंदर्भात किल्ले वाचवा आंदोलने असो की रायगड प्राधिकरणाच्या दुर्गपरिषदा यात वारंवार दुर्गांच्या संवर्धन कार्यातील अडीअडचणी व राज्यसरकार केंद्र व त्यांच्या पुरातत्व,वन विभागाबाबत तक्रारी वारंवार केल्या आहेत असे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने सांगितले.
दरम्यान छत्रपती शिवशंभू महाराज व त्यांच्या स्वामिनिष्ठ मावळ्यांनी परकीयांच्या ताब्यातील सह्याद्री पर्वतरांगेतील गडकोटांना स्वराज्यात आणले.या गडकोटांवरच स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.राज्यकारभार चालला.गडकोट हे मूर्तिमंत रूपाने छत्रपती शिवशंभू महाराज आहेत,मावळ्यांची ही धारतीर्थे आहेत,या त्याग बलिदानाच्या भूमीला स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांभीर्याने संवर्धनाचे कार्य कुठल्याही सरकारने केले नाही,सामाजिक राजकीय दुर्लक्षाने दुर्गांच्या पाऊलखुणा केवळ नावालाच उरल्याचे वास्तव आहे,प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी,प्रशासन व लोकप्रतिनिधींना ही या दुर्गांची मूळ वस्तुस्थितीची माहितीच नसल्याचे एकूण समजते,केवळ दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून गडकोटांच उरळसुरल अस्तित्व वाचवण्याचे कार्य अविरत आहे.एकूणच दुर्गसंवर्धन कार्याला दुर्लक्षित ठेवून केवळ मंत्र्यांच्या बंगल्यांना नावे देण्याचा राज्यशासनाचा निर्णय त्यांच्या अखत्यारीत असला तरी दुर्गांची दुरवस्था ही दुर्लक्षून चालणार नाही,केवळ गडकोटांची एकीकडे आत्यंतिक दैना असतांना केवळ गडांची नावे मंत्र्यांच्या बंगल्याना देन्याइतपत तत्परता राज्यातील दुर्गांच्या संवर्धनाप्रति दाखवावी असे आवाहन शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने केले आहे.

प्रतिक्रिया –
राम खुर्दळ, (संस्थापक)
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था,नाशिक जिल्हा,
नाशिक जिल्ह्यातील ६० हुन अधिक गडकोट,ज्ञात अज्ञात वाडे,समाध्या,बारवा,यांचे अखंडित संवर्धनासाठी १५ वर्षे आम्ही राबत आहोत,कुठल्याही मदतीशिवाय हे कार्य सातत्यपूर्ण करीत आहोत,छत्रपती शिवराय शंभूराजे व मावळ्यांच्या या ऐतिहाशिक पाऊलखुणा अभ्यासात्मक जोपासत आहोत,मात्र दुःख याचे होते की दुर्गवारसा असुरक्षित दुर्लक्षित पडझडीत आहे,याकडे संबंधित व शासकीय यंत्रणेचे वारंवार दुर्लक्ष आहे.आम्हीं राज्यस्थरिय किल्ले वाचवा आंदोलन केली,आजपर्यंत असंख्य निवेदने सरकारला पाठवली.उध्वस्त भग्नावस्थेत असलेली दुर्गे त्यांच्या वास्तूंची हेळसांड बघून वेदना होतात मात्र सांगणार कोणाला?कोणी ऐकायला हवे ना.मात्र अखेरपर्यंत दुर्गांच्या अस्तित्वासाठी राबत राहू .