Home नांदेड पेन्शन असोसिएशन पुणे च्या वतीने जी. बी.पांचाळ यांना पुरस्कार प्रदान

पेन्शन असोसिएशन पुणे च्या वतीने जी. बी.पांचाळ यांना पुरस्कार प्रदान

199

धर्माबाद : ता.प्रतिनिधी राहुल वाघमारे

महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन पुणे यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन निवृत्त सेवा पुरस्कार २०२१ चा धर्माबाद येथील हू.पानसरे प्रा. शाळेचे सेवानिवृत्त  आदर्श मु.अ. गंगाधर भुमन्‍ना पांचाळ यांना पुणे येथे नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र पेन्शन असोसिएशन पुणे चे कार्याध्यक्ष माननीय सोमनाथ राव नाईक, अध्यक्ष एन. डी. मारणे, सचिव लक्ष्मणराव टेंबे, कोषाध्यक्ष श्रीकांत वागळे, चौधरी शेख हुसेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. धर्माबाद पेन्शनर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष जी.पी. मिसाळे, उपाध्यक्ष श्रीराम गोविंदलवार, सचिव शंकरराव कामीनवार, भारत स्काऊट गाईड चे माजी जि. सचिव बा.पा. कुदाळे, सा.ना. भालेराव से.नि. मुख्याध्यापक, भगवानराव कदम, आय. बी. पांचाळ, विठ्ठलराव रटकलवार, मा. कृषी अधिकारी हनुमनलू सुरकुटवार, गंगाराम चातरमन, तलाठी   माधवराव पाटील यांनी अभिनंदन केले.