
” सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीची शिक्षण विभागाने घेतली दखल”
चिखली:- प्रा , तनजीम हुसेन
नुकतेच जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षण विभागाकडून जिल्हाभरातील आदर्श शिक्षकांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये जिल्हा परिषद उर्दु उच्च प्राथमिक शाळा सुलतानपूर येथील कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक अब्दुल सईद अब्दुल हमीद यांची निवड 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी आदर्श शिक्षक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बुलढाणा, यांनी सदर यादी प्रसिद्ध केली आहे. यादी झळकताच अब्दुल सईद यांच्या मित्र परिवारामध्ये आनंदाची लहर आली आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे उल्लेखनीय कामगिरी व महत्वाच्या जबाबदाऱ्या सदर शिक्षकांनी आपले २० वर्षीय सेवा काळामध्ये बजावले आहेत. त्याची दखल घेऊन शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक म्हणून त्याची निवड केली आहे. शैक्षणिक कामाव्यतिरिक्त सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग नेहमीच उल्लेखनीय असतो.आनंद मेळावा,महिला मेळावा, थोर पुरुषांची जयंती व पुण्यतिथी, लेक वाचवा कार्यक्रम, पुस्तके व गणवेश वाटप, विविध क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये सक्रिय सहभाग, प्रगत शिक्षण महाराष्ट्र कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय उपक्रम अब्दुल सईद यांनी राबविले आहे. त्यासोबतच वृक्षारोपण, कुटुंब कल्याण योजना, पल्स पोलिओ मोहिम, अपंग शिबीर, रक्तदान शिबीर, स्वच्छ भारत अभियान, कविसंमेलन, शांतता समिती व जनगणना सारखे राष्ट्रीय कार्यक्रमात त्यांनी उत्कृष्टपणे कार्य केलेले आहे. त्यासोबतच अनेक प्रशिक्षणामध्ये तालुका जिल्हा स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम (माध्यमिक) अधिनियमचे उर्दू मध्ये भाषांतर समितीमध्ये सुद्धा त्यांचा समावेश होता. जिल्हा व विभागीय क्रीडा संस्थांमध्ये त्यांनी अनेकदा जिल्हा परिषद बुलढाणाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या सर्व सामाजिक शैक्षणिक क्रीडा व राष्ट्रीय कामगिरीमुळे सदैव अब्दुल सईद हे चर्चेत राहतात.
लोकप्रिय शिक्षक व विद्यार्थी मित्र शिक्षक म्हणून सुद्धा त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे. ते शिक्षकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकरिता सदैव प्रयत्नशील असतात, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या जिला अध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष पदावर त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. सर्व मित्र मंडळ, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक, आणी शिक्षक संघटनांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या आदर्श शिक्षक सन्मान मिळाल्याबद्दल अब्दुल सईद यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अब्दुल हमीद सर यांचे चिरंजीव आहे हे विशेष.











































