
प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव राजा:- नांदेड येथे झालेल्या राज्य स्थरीय कराटे स्पर्धेत भाग घेतलेले देऊळगाव राजा स्पोर्ट कराटे असोसिएशनचे विद्यार्थी गौरव रायलकर आणि अभिषेक चव्हाण या दोन्ही विद्याथ्यांनी सिल्व्हर मेडल पटकावले
नुकतीच दिनांक 19 डिसेंबर रोजी नांदेड येथे झालेल्या झालेल्या राज्यस्तरीय सीनियर आणि ज्युनियर कराटे चॅम्पियन शिप मध्ये राजेश खांडेभराड सर याच्या मार्गदर्शनाखाली सौदागर सर याच्या टीम सोबत कडून खेळत देऊळगाव राजा येथील स्पोर्ट अकॅडमी चे विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करीत गौरव रायलकर आणि अभिषेक चव्हाण या दोघांनी सिल्व्हर मेडल पटकावले त्यामुळे सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.











































