Home बुलडाणा शासनमान्य पत्रकार संरक्षण समितीच्या नांदुरा तालुकाध्यक्ष पदी शिवाजी चिमकर यांची निवड

शासनमान्य पत्रकार संरक्षण समितीच्या नांदुरा तालुकाध्यक्ष पदी शिवाजी चिमकर यांची निवड

507

बुलडाणा/प्रतिनिधी

न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या नांदुरा तालुकाध्यक्षपदी येथील सकारात्मक वृत्त लिखाण करुन आपली समाज घटकांवर आगळीवेगळी छबी निर्माण करणारे शिवाजी पंढरी चिमकर यांची निवड संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,राज्य सचिव अनिल चौधरी पुणे, तर राज्य उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ नाशिक, महासचिव सिध्दार्थ काळे मुंबई,जिल्हाकार्याध्यक्ष बाबासाहेब जाधव,यांच्या आदेशानुसार पत्रकार संरक्षण समितीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष तथा दैनिक लोकमंथन चे निवासी संपादक पुरुषोत्तम बोर्डे,बुलडाणा तालुकाध्यक्ष समाधान चिंचोले,संघटक दिपक मोरे,रमेश खंडारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवाजी चिमकर हे एक सकारात्मक वृत्तीचे पत्रकार आहेत समाज हितासाठीच लेखणी चालवतात तर ते सामाजिक श्रेत्रात निस्वार्थ पणे आपले योगदान कायम देत असतात, ते पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नक्कीच लढतील असा आशावाद बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केला आहे.शिवाजी चिमकर यांची पत्रकार संरक्षण समितीच्या नांदुरा तालुक अध्यक्षपदी निवड होताच संपुर्ण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्यावर विविध सामाजिक संघटनांकडून कौतुकाचा वर्षांव होत आहे.