Home साहित्य जगत शिकवणी…,”शिक्षक”

शिकवणी…,”शिक्षक”

551

शिकवणी ..

शिक्षक दिन हा आला
जत्रेचं रूप झोपडीला
हवसे गवसे नि नवसे
किती आले भेटायला

ओळखीचे अनोळखी
कुणी ना आठवे मला
फोटोसाठी पोज देता
थकून गेलो रे चांगला

हार फुलांचा खच पडे
पगार मात्र अडकला
चौकशी करे वेतनाची
नेता कसला भडकला

मिठाई पाहून कसला
मधु मेह गोड हसला
वाटून टाकली मिठाई
हवे किती एकट्याला

शिक्षक दिवस सरता
खुशाल विसरा मला
विसरू नका मात्र बा
रे माझ्या शिकवणीला

शिक्षक .

मातेच्या ममत्वाने
करितो श्रीगणेशा
शिक्षक रे जादुगार
बदलतो भाग्य रेषा

वळण देई जिभेला
असो कुठली भाषा
पिता तोचि बनतो
टेकवितो आकाशा

नातेकधी बंधुत्वाचे
जाणवते तयास्पर्शा
भगिनी बनूनि कधी
करी तो स्नेह वर्षा

तोचरूप पुस्तकाचे
भागवतो ज्ञान तृषा
मित्रसवंगडी बनतो
पुलकीत करे आशा

दाट काळोखा नंतर
अवतरे हळूचं उषा
ईश्वरी साक्षात्कारतो
धारितो नाना वेशा

– हेमंत मुसरीफ पुणे.
973030696