Home बुलडाणा कुख्यात मोटरसायकल चोर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

कुख्यात मोटरसायकल चोर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

707

 

स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी , 

प्रा , तंजीम हुसेन , 

चिखली , प्रतिनिधी 
बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढत्या मोटरसायकल चोरीचे प्रमाण बघता पोलीस अधीक्षक बुलढाणा अरविंद चावरिया साहेब यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या करिता स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा चे एक विशेष पथक स्थापन केले असता सदर पथकाने मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीवरून दिनांक 3 सप्टेंबर रोजी संशयित संतोष गोविंद वानखडे वय 28 वर्षे व्यवसाय शेती राहणार पिंपरी कोर्डे तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यास ग्राम उंद्री येथे त्याच्या ताब्यात असलेल्या दुचाकी गाडी बद्दल विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गाडी चोरीची असल्याबाबत ची कबुली दिली त्याच घटनास्थळी अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र नामे आकाश भगवान खरात वय 30 वर्ष राहणार हिवरा खुर्द तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांचे सह पोलीस स्टेशन अमडापूर, जानेफळ मेहकर जिल्हा बुलढाणा तसेच जिल्हा अकोला येथून गाड्या चोरी केले बाबतची कबुली दिली त्यानुसार नामे आकाश भगवान खरात वय 30 वर्ष राहणार हिवरा खुर्द तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांचे राहते घरून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे मित्र संतोष गोविंद वानखडे यांच्या सोबत दुचाकी गाड्या चोरी केलेल्या बाबतची कबुली दिली दोन्ही आरोपीकडून चोरी केलेले एकूण 11 दुचाकी वाहने तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेली 2 दुचाकी वाहने 2 मोबाईल असा 5,25000/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी पोलीस स्टेशन अमडापूर अपराध क्रमांक 369/2021 कलम 379 भादवी मध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन अमडापूर यांचे ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई श्री अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा बजरंग बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली अमित वानखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके पोलीस उपनिरीक्षक पोलीस अमलदार पंकज कुमार मेहेर, दिनेश बकाले, पुरुशोत्तमा आघाव, गजानन गोरले, रवी भिसे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी केली.