Home साहित्य जगत कान्हा जन्म…!

कान्हा जन्म…!

287

जिथे कान्हा जन्मला

धन्य धन्य बंदीशाळा

सुख दिले जगताला
सार्थक देवकी कळा

राक्षस मर्दन कराया
मनुष्ययोनीत दयाळा
वेदनामुक्ती तूचं देशी
श्वासास करी मोकळा

उजळले सहस्त्र सूर्य
रंगाने जरी तू काळा
हृदय निर्मळ दुधाळा
अंतर्बाह्य तू आगळा

हालाहल पचवेसहज
झाला प्रिय घननिळा
शहाणा बनतो खुळा
लावशी वेड गोकुळा

खोड्या किती अनंत
आवडी लोणी गोळा
निमीत्त ते तक्रारींचे
ग्रामस्थसमस्त गोळा

उद्धार करी नारींचा
बायका सहस्त्रसोळा
छेड काढी गोपीका
मना निर्मळ मोकळा

अनंत लीला अनंता
कळला नाही काळा
असता भक्त भोळा
आपला वाटे सकळा

– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.