
(प्रतिनिधी) – रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा:- जिल्ह्यातील व देऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्वाचे समजले जाणारे अंढेरा पोलीस स्टेशन चे मावळते ठाणेदार राजवंत आठवले यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाली असुन त्यांच्या रिक्त झालेल्या जागी २५ आॕगस्ट रोजी मावळते ठाणेदार राजवंत आठवले यांच्याकडून बुलढाणा येथून पासपोर्ट शाखेतुन आलेले अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून गणेश हिवरकर यांनी पदभार स्वीकारला.त्यांचे पत्रकार मंडळींनी सत्कार केला.यावेळी पत्रकार शेख हनिफ,स्वप्नील शिंदे,ज्ञानेश्वर म्हस्के आदी उपस्थित होते.











































