Home बुलडाणा जातीच्या पलीकडे जाऊन समाज प्रबोधन करता आलं पाहिजे:-प्रा. कमलेश खिल्लारे

जातीच्या पलीकडे जाऊन समाज प्रबोधन करता आलं पाहिजे:-प्रा. कमलेश खिल्लारे

288

_मंडपगाव येथे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी.._

देऊळगाव मही/(प्रतिनिधी) – मंडपगाव येथे वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी असलेले प्रा.कमलेश सर व उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते एकलव्य प्रतिमेचं पूजन करण्यात आलं,त्याच बरोबर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आकाश बर्डे, अजय माळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषण करतांना प्रा.कमलेश खिल्लारे यांनी सांगितलं समजातील उपेक्षित घटकाला आपण शिक्षणासाठी प्रवृत्त करून आप आपल्या परीने सहकार्य करायला हवं,आणि जयंती फक्त एका महापुरुषा पूर्ती मर्यादित न ठेवता जातीच्या पलीकडे जाऊन समाज प्रबोधन आपल्याला करता आलं पाहिजे असं प्रतिपादन एकलव्य जयंती निमित्त प्रा.कमलेश खिल्लारे यांनी केलं.
एकलव्य हे आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असणारे महामानव असून युवकांनी तो आदर्श समोर ठेऊन आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून स्वतः मध्ये,समाजा मध्ये वैचारिक परिवर्तन घडवत समाज व्यसनमुक्त करून शिक्षित कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे.
पुढे बोलतांना प्रा. खिल्लारे म्हणाले त्या काळात मानसिक रित्या दुर्बल असलेल्या गुरू ने बहुजन एकलव्याचा अंगठा मागितला व एकलव्याने तो दिला ही परन्तु आता एकलव्यांच्या वैचारी वारसदारांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विचार स्वातंत्र्याची,अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, हक्काची,बंदूक दिली आहे त्यामुळे आता कोणता गुरू अंगठा मागू शकणार नाही व आताचा एकलव्य अंगठा देणार ही नाही कारण बहुजन आता विचारांनी सक्षम झाला आहे.
युवकांनी आता शिक्षण घेतलं पाहिजे,पुस्तक वाचली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे बोलकं झालं पाहिजे बोलण्याने समाज प्रबोधन होईल व समाज प्रबोधनातून एकलव्य,शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महान मानवांचे चरित्र आपल्याला कळतील.
यावेळी छत्रपती अर्बन चे अध्यक्ष समाधान शिंगणे, मंडपगाव चे तंटामुक्त अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सुभाष बाप्पू देशमुख,मा.उपसरपंच राजू पठाण सुभाष माळी,मा.सरपंच गजानन माळी,बंडू माळी,शेख महेमुद भाई,जेष्ठ नागरिक आत्माराम माळी,रामभाऊ देशमुख,उत्तम मापारी
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश माळी सर, पो.को.सुमित माळी, भैय्यासाहेब देशमुख पत्रकार आदिल पठाण,राजू माळी, साजिद पठाण,बारकू बर्डे, सुदाकर बर्डे,मधुकर माळी,अंकुश माळी,सुनील बर्डे, रमेश घोंगडे,माजी सैनिक अशोक चेके,राधाकीसन बर्डे,प्रल्हाद सोनुने, दामू सोनुने ,विशाल माळी, अमोल मोरे, आकाश बर्डे, करण बर्डे, रोहन सोनुने,उमेश सोरमारे,स्वराज बर्डे, दगडुबा पवार,अरुण कदम, संजय मुंढे,संतोष रेशवाल,गणेश घोंगडे दिलीप देशमुख बशीर शेख,शारुख शेख, मतीन पठाण,यांनी परिश्रम घेतले.
यावेळी कार्यक्रमात गावकरी मंडळी,युवक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिल पठाण यांनी केले तर आभार योगेश माळी यांनी मानले.