Home बुलडाणा येत्या जिल्हा परिषद निवडणूकी साठी जोमाने कामाला लागा – रविकांत तुपकर

येत्या जिल्हा परिषद निवडणूकी साठी जोमाने कामाला लागा – रविकांत तुपकर

222

प्रतिनिधी【रवि आण्णा जाधव】

देऊळगाव राजा :-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देऊळगाव राजा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीसाजरी करून पुढील कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.

येत्या काळातीली संघटना बांधणी, गावोगावी शाखा उभारणे, स्थानिक प्रश्नांवर आंदोलन उभे करणे याबद्दल चर्चा करण्यात आली. खडकपूर्णा पट्यातील ऊस रहदारीचे रस्ते खराब झाल्याने ऊस वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. देऊळगाव मही परिसरात विजेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ज्वारीची नाफेडमार्फत खरेदी चालू व्हावी,जिल्हा परिषदेचे संपूर्ण सर्कल पिंजून काढून त्या समस्या मार्गी लावू येत्या काळात देऊळगाव मही सर्कल मद्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच उमेदवार निवडून येईल व अशा शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आक्रमक आंदोलन उभे करण्याचे याबैठकीत ठरले.
बैठकीस स्वा.शे.सं.जि.अध्यक्ष बबनराव चेके,युवा.आ.जि. अध्यक्ष सतिष मोरे,जि.सरचिटणीस शेख जुल्फेगार शेट,सिं.राजा वि.सभा अध्यक्ष मधुकर शिंगणे,ता.अध्यक्ष गणेश शिंगणे, ता. उपध्यक्ष वसंतराव दहातोंडे, ता.सचीव प्रवीण राऊत, ता.उपध्यक्ष अंबादास बुरकूल, पंढरीनाथ म्हस्के, पुंडलीकराव शिंगणे, गजानन राऊत, शमभाऊ राऊत, भागवत शिंगणे, संतोष देठे, विठोबा नागरे, संतोष सानप, गणेश वखारे, पंढरीनाथ कुटे यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.