Home बुलडाणा मलकापूर पांग्रा येथील अपंग युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मलकापूर पांग्रा येथील अपंग युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

304

 

 

भगवान साळवे 
सिंदखेड राजा
तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील येथील 36 वर्षीय अपंग तरुण गोविंदा संपत नागरे याने दिनांक २६ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घराजवळ असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर पांग्रा येथील गोविंदा नागरे हा तरुण पायाने अपंग होता तरीदेखील तो या अपंगावर मात करून बाजारातील दुकानात काम करून तर कधी चार चाकी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करायचा आपल्या संसाराचा गाडा चालत असताना अचानक त्याने आज सोमवारला सकाळी सात वाजता पांगरा येथील त्याचा घराजवळच लागून असलेल्या आटोळे यांच्या शेतातील विहिरीत त्याने आत्महत्या केली या घटनेची तक्रार शिवाजी मांटे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन ला दिली त्यावरून साखरखेडा पोलीस स्टेशन चे बिट जमादार नारायण गीते पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर यांनी घटनास्थळी येऊन मृतक गोविंदाचा मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी बीबी येथे पाठविला गोविंदावर अत्यंत शोकाकूल वातावरणात मलकापूर पांग्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आत्महत्येचे कारण अद्याप सष्ट झाले नसले तरी कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा गावात ऐकायला मिळत आहे याप्रकरणी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार नारायण गीते विशाल बनकर पुढील तपास करत आहे