Home बुलडाणा “आता शाळा सुरू कराच” , अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने केली राज्य...

“आता शाळा सुरू कराच” , अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने केली राज्य शासनाकडे मागणी…!

132

सैय्यद तौसीफ- सिंदखेड राजा

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याबाबत राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेने विनंती केली.
जालना चे आमदार व राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कैलाससेठ गोरंट्याल यांच्या नेतृत्वात अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य प्रवक्ता तथा जालना जिल्हा अध्यक्ष जावेद खान यांनी हा विषय मांडला. कोरोना मुळे मागील 16 महिन्यांपासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे,मात्र ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे परिणामकारक नसल्याने विद्यार्थ्यांचे,विशेषतः प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे जास्त शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील वर्षी पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थी शाळेत न जाता दुसऱ्या वर्गात आलेले आहेत. राज्यात सर्वच क्षेत्रांमध्ये काम सुरू असताना फक्त शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवणे ही बाब विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. तरी विद्यार्थीहितार्थ राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय सरसकट सुरू करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित करण्याची विनंती संघटनेचे राज्य अध्यक्ष मुहम्मद हनीफ आणि राज्य सचिव शेख ज़मीर रज़ा यांनी केली आहे.