Home रायगड आंबेडकर स्टुडंट् असोसिएशन ने घेतली कुलगुरूंची भेट 

आंबेडकर स्टुडंट् असोसिएशन ने घेतली कुलगुरूंची भेट 

243

महाड – राज सकपाळ

रायगड – महाड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय प्राचार्य पदाचा वादासंबंधी आंबेडकर स्टुडंट् असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांची भेट घेतली .महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय प्राचार्य पदाच्या वादातून नेहमी रक्तरंजित हाणामारी होते.या हाणामारीचे पडसाद विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असून महाविद्यालयात गुंड लोकांना खाजगी संरक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे एक महत्त्वाचे महाविद्यालय म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ओळखले जाते.परंतु अलिकडील काही वर्षांत या महाविद्यालयात प्राचार्य पदावरून मोठा वाद उद्भवला आहे.अनेक प्रकारचे गंभीर गुन्ह्यांमध्ये तुरूंगवास भोगलेल्या प्राचार्या वर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून महाविद्यालयाचा कारभार प्रशासकीय अधिकारी यांचे तर्फे चालवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली .विद्यापीठ नियमानुसार दोषींवर कडक  कारवाई करून महाविद्यालयात शैक्षणिक शांतता निर्माण करावी . महाविद्यालयात चालणा-या भ्रष्ट कारभाराची उच्चस्तरीय अधिका-यांची समिती स्थापन करून  विद्यार्थ्यांकडून अवाजवी फिवसुली , शिष्यवृत्ती घोटाळा ,परीक्षा विभातील गोंधळ तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी.महाविद्यालयाचे भ्रष्ट व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांना महाविद्यालय प्रवेश बंदी करण्यात यावी यासाठी ही भेट घेण्यात आली.मुंबई विद्यापीठ महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रश्न सोडवेल व दोषींवर कारवाई करण्यात येईल असे या बैठकीत सांगण्यात आले आहे.महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा वाद मिटला नाही तर आंबेडकर स्टुडंट् असोसिएशन ने उपोषणाचा इशारा दिला होता . या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी आंबेडकर स्टुडंट् असोसिएशन चे अध्यक्ष सचिन मनवाडकर ,प्रवक्ता आनंदराज घाडगे  भीम आर्मी चे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे , मुंबई विद्यापीठ कुलसचिव प्रा.बळीराम गायकवाड उपस्थित होते .येणा-या आठ दिवसांत डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे  प्रश्न निकाली निघाले नाही तर मुंबई विद्यापीठ येथे उपोषणास सुरुवात करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.